युद्धखोर नेत्यांची प्रार्थना देव स्वीकारणार नाही; पोप लिओ यांची नाव न घेता ट्रम्प यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगावर महायुद्धाचे सावट गडद होत असतानाच, कॅथोलिक धर्मगुरू पोप लिओ यांनी रविवारी जागतिक नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. “जे नेते स्वतः युद्धाची ठिणगी टाकतात आणि रक्ताचा खेळ खेळतात, त्यांच्या प्रार्थना देव कधीही स्वीकारणार नाही,” असे विधान पोप यांनी केले आहे. पोप यांनी आपल्या भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, त्यांचा रोख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण-इस्रायल संघर्षात आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांकडे असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

सेंट पीटर्स स्क्वेअर येथे जमलेल्या हजारो भाविकांना संबोधित करताना पोप लिओ भावूक झाले होते. ते म्हणाले की, “एका बाजूला विनाशकारी शस्त्रास्त्रांचे आदेश द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला शांततेसाठी हात जोडायचे, हा ढोंगीपणा आहे. युद्धाचा निर्णय घेणारे नेते विसरतात की, त्यांच्या एका निर्णयामुळे हजारो निष्पाप मुलांचा बळी जातो.”

पोप यांनी आपल्या संदेशात युद्धामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांचा आणि अनाथ मुलांचा उल्लेख केला. “देवाला रक्ताने माखलेले हात नको आहेत, तर मदतीसाठी पुढे आलेले हात हवे आहेत. जे सत्ताधीश आपल्या अहंकारामुळे जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतात, त्यांना ईश्वराच्या दरबारात कधीही माफी मिळणार नाही,” असे ते म्हणाले.

Comments are closed.