फिरकी गोलंदाज गोहर सुल्तानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सध्या हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींना महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले आहेत. तसेच लवकरच बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच हिंदुस्थानी संघाला धक्का बसला असून अनुभवी गोलंदाज गोहर सुल्तानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. गोहरने इन्स्टाग्रामवरुन निवृत्तीची घोषणा केली. आगामी मालिकेसाठी 19 ऑगस्टला हिंदुस्थानी महिला संघाची घोषणा करण्यात आली. फिरकीपटू गोहरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एपूण 95 विकेट्स टिपल्या आहेत. गोहरने एकदिवसीय सामन्यात 66 तर टी-20 मध्ये 29 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गोहरची 4 धावांत 4 विकेट्स ही वन डेतील सर्वोच्च कामगिरी ठरली. तसेच गोहर वूमन्स प्रीमीयर लीग स्पर्धेतही दोन हंगामात खेळली. गोहरने 50 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामान्यांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र गोहर गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर होती. गोहर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा एप्रिल 2024 मध्ये खेळली होता. गोहरने मे 2008 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं होतं.

Comments are closed.