सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, चांदी सव्वा दोन लाखांवर पोहोचणार, तज्ज्ञांचा नवा अंदाज


सोने आणि चांदीच्या किंमतीचा अंदाज नवी दिल्ली: सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. सध्या सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीनं देखील 1 लाख 80 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र, गुंतवणूकदारांकडून सोने आणि चांदीमध्ये जोरदार गुंतवणूक सुरु आहे. धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची 60 हजार कोटी रुपयांची विक्री झाली. सोन्यातील गुंतवणुकीमुळं गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळत आहे.

Gold Retrun : 5 वर्षात 200 टक्के रिटर्न :

ऑक्टोबर 2020 मध्ये सोन्याची एका तोळ्याची किंमत 47000 रुपये होते. ऑक्टोबर 2025 मध्ये सोन्याचा एका तोळ्याचा दर 1.30 लाख रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात सोन्यात गुंतवणूक करणारांना 200 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत सोन्यातील गुंतवणुकीर 60 टक्के परतावा मिळाला होता. या वर्षी सोन्याच्या दरात 54700 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 76162 रुपये होता. जो सध्या 1 लाख 30 हजार 840 रुपये आहे. म्हणजेच या वर्षी सोन्यानं 70 टक्के रिटर्न दिले आहेत.

सोने आणि चांदीचे दर वाढणार

तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा एका तोळ्याचा दर 1 लाख 60 हजार रुपये असेल. तर, 2025 मध्ये सोन्यानं 70 टक्के परतावा दिला आहे. ब्रिटनची बँक SSBC च्या अंदाजानुसार 2026 मध्ये सोन्याचे दर 5000 डॉलर प्रति औंसवर जाण्याची शक्यता आहे. या हिशोबानं भारतात सोन्याचे एका तोळ्याचे दर  1 लाख 50 हजार रुपये असतील. सोन्याच्या दरानं 5000 डॉलरचा टप्पा पार झाल्यास दर 1 लाख 60 हजारांवर पोहोचू शकतो. सध्या सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति औंसवर आहे. बँक ऑफ अमेरिकेनं देखील सोन्यासाठी टारगेट प्राइस वाढवून 5000 डॉलर केलं आहे.

ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये देशातील चांदीचा दर 2 लाख 40 हजारांपर्यंत पोहोचू शकतो. सध्याच्या दरापेक्ष अंदाजित रक्कम 46 टक्के अधिक आहे. जागतिक स्तरावर चांदीचे दर 2027 पर्यंत 70 डॉलर प्रति औंस होणार आहेत. 2026 मध्ये  चांदीचा दर 75 डॉलर प्रति औंस तर 2027 पर्यंत 77 डॉलर प्रति औंस इतका असू शकतो. जागतिक पुरवठा कमी आणि औद्योगिक मागणी वाढल्यानं चांदीचे दर वाढू शकतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.