सोन्या-चांदीचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर आहेत.

सोने 1,805 रुपयांनी वाढून 1.34 लाख रुपये प्रतितोळा : चांदी 7,483 रुपयांनी वाढून 2.08 लाख रुपये प्रतिकिलो

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोने आणि चांदीच्या किमती सोमवारी 22 डिसेंबर रोजी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने 1,805 रुपयांनी वाढून 1,33,584 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. देशात विविध ठिकाणी करांसह हा दर 1.34 लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता. पूर्वी हा दर 1,31,779 रुपये होता. सोन्यासोबत चांदीची किंमत 7,483 रुपयांनी वाढून 2,07,550 रुपये प्रतिकिलो झाली. पूर्वी हा दर 2,00,067 रुपये होते. यावर्षी आतापर्यंत सोने 57,400 रुपयांनी आणि चांदी 1,21,500 रुपयांनी महाग झाली आहे.

मौल्यवान धातूंच्या किमतीचा विचार करताना जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्स मार्जिनमध्ये बदल असल्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये दर बदलतात. हे दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सॉवरेन गोल्ड बॉण्ड्ससाठी दर निश्चित करण्यासाठी वापरते. अनेक बँका सोन्याच्या कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी त्यांचा वापर करतात

 

Comments are closed.