सोने चांदीच्या दरात उसळी, दीड महिन्यात सोनं 10 हजारांनी महागलं, 10 ग्रॅम किती रुपयांना?

सोन्याचे चांदीचे दर नवी दिल्ली : भारतीय गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र  2025 मध्ये पाहायला मिळतंय. सोन्याच्या दराची वाटचाल 1 लाख रुपयांच्या दिशेनं सुरु झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 899 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 85744 रुपये आहे. चांदीच्या दरात देखील 1437 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचे दर 95626 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सोने आणि चांदीचे दर जीएसटीशिवायचे असून त्यामध्ये जीएसटीची रक्कम मिळवल्यास 1 ते 2 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

सोनं 10000 रुपयांनी महागलं

नववर्षात सोनं 10 हजार रुपयांनी महागलं आहे. तर, चांदीच्या दरात 9609 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला सोनं 75740 रुपये होतं. तर, जीएसटी आणि इतर करांसह सोन्याची किंमत 79 हजार रुपयांच्या दरम्यान होती. चांदीचे दर 31 डिसेबर 86017 रुपये होता. सर्राफा बाजारात सोन्याच्या दरानं 89500 रुपयांपर्यंत मजल मारली होती. म्हणजेच,  दीड महिन्यात सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी वाढला आहे.

आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 23 कॅरेट सोन्याच्या दरात 876 रुपयांची वाढ होऊन 85401 रुपयांवर पोहोचला आहे.  22 कॅरेट सोन्याच्या दरात 824 रुपयांची वाढ झाली असून सोनं 78542 रुपयांवर पोहोचलं आहे. तर,  18 कॅरेट सोन्याचा दर 674 रुपयांनी वाढून 64308 रुपयांवर पोहोचला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 50160 रुपयांवर पोहोचला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोन्याची दमदार कामगिरी

4 फेब्रुवारी 2025 ला 10  ग्रॅम सोन्याचा दर 83010 रुपयांवर होता.
5 फेब्रुवारी 2025 ला 10  ग्रॅम सोन्याचा दर 84657 रुपयांवर होता.
6 फेब्रुवारीला सोनं 84672 रुपयांवर पोहोचलं होतं.
7 फेब्रुवारीला सोन्याचा दर 84699 रुपयांवर पोहोचलं होता.
10 फेब्रुवारीचा दर 85665 रुपये इतका होता.
11 फेब्रुवारीला सोन्याचा दर 85903 रुपयांवर पोहोचला होता.

सोने दरात वाढ का?

जागतिक बाजारात वाढत्या अस्थिरतेमुळं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय शोधले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा, चीनवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली होती. याशिवाय स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या आयातीवर  टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वामुळं अमेरिकेचा डॉलर मजबूत बनल्यानं विदेशी गुंतवणूकदार अमेरिकेच्या शेअर बाजाराकडे वळले. परिणामी इतर देशांच्या शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. यामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं. जगभरातील केंद्रीय बँका आणि रिटेल गुंतवणूकदारांनी सोने खरेदी केल्यानं दरात वाढ झालीय.

इतर बातम्या :

अधिक पाहा..

Comments are closed.