सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक अधिक फायद्याची, चांदीच्या दरात दुप्पट वाढ होणार, अभ्यासकांचा दावा
सोने आणि चांदी: अलिकडच्या काळात चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ (चांदीचा दर) झाली आहे. त्याची किंमत सध्या 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु, तज्ञांच्या मते, सध्या त्यात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या 35 डॉलर प्रति औंस असलेली चांदीची किंमत या वर्षी दुप्पट होणार असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळं गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोन्यापेक्षा चांदी चांगला पर्याय मानला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवत होते. परंतु चांदी सध्या 35 डॉलर प्रति औंस आहे, जी संभाव्यतः दुप्पट होऊ शकते म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस 70 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळं चांदीच्या दरात वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.
मागणी का वाढत आहे?
सध्या चांदीची (Silver) मागणी वाढण्यामागे अनेक घटक आहेत. सौरऊर्जेसारख्या क्षेत्रांसोबतच, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वात योग्य वस्तू मानतात हे निश्चितच खरे आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत चांदीची किंमत 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. जर आपण या वर्षाबद्दल बोललो तर, फक्त सहा महिन्यांत चांदी 87000 रुपयांवरून 1.04 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, बाजारातील तज्ञांचा असा विश्वास आहे की त्याची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळ जाऊ शकते. परंतु रॉबर्ट कियोसाकी यांनी या वर्षी चांदीची किंमत दुप्पट करण्याचा दावा थोडा जास्त वाटू शकतो. परंतु, यावर्षी चांदी प्रचंड तेजीत राहील हे निश्चित आहे.
सोन्या चांदीच्या दरात का वाढ होत आहे?
इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे. ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे. यामुळं जगभरात पुन्हा आर्थिक संकट वाढलं आहे. डॉलर इंडेक्समध्ये देखील कमजोरी पाहायला मिळाली. वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो. सध्या चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gold Rate News : इस्त्रायल- इराण वादाचा भडका, सोनं एका दिवसात 2000 रुपयांनी महागलं, सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार
आणखी वाचा
Comments are closed.