31,561 कोटी रुपये! गोल्ड ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक, वर्षभरात तब्बल 64 टक्के परतावा
गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीचे दर दुपटीपेक्षा जास्त वाढले. त्यामुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीवर 64 टक्के नफा दिला आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे भरघोस परतावा मिळाला आहे. यावर्षी जानेवार ते मार्च या तिमाहीमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 31,561 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. डिसेंबर 2025च्या तिमाहीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी गुंतवणूक वाढली आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये 23,132 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. गोल्ड ईटीएफ हा सोन्यात गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी ही गुंतवणूक जास्त सुरक्षित असल्यामुळे याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे.
यामुळे वाढली गुंतवणूक
जानेवारीमध्ये सोन्याच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या होत्या. सोन्याचे दर 1.5 लाख रुपये प्रति तोळ्याच्या वर पोहोचले होते. त्यामुळे या तिमाहीत भरघोस परतावा मिळाला. त्यामुळे गुंतवणूकदार याकडे आकर्षित झाले. गेल्या वर्षी मार्चपर्यंत 69.69 लाख गुंतवणूकदार होते. यावर्षी मार्च महिन्यापर्यंत हा आकडा 54 टक्क्यांनी वाढून 1.24 कोटींवर गेला.
Comments are closed.