सोन्याच्या दरात एका आठवड्यात मोठी उसळी, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोन्याचा दर वाढला डॉलर दर: गेल्या काही दिवसात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण होताना दिसत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमती वाढण्यात झाला आहे. परिणामी एकाच आठवड्यात सोन्याच्या किंमतीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 5000 रुपयांची वाढ होऊन एक तोळे सोन्याचा (Gold price) दर जीएसटीसह 1 लाख 31 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या (Dollar Vs Rupee) तुलनेत रुपयाची मोठी घसरण सुरु आहे. रुपयाने ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली आहे. कधी नव्हे ते रुपयाचा भाव एका डॉलरच्या तुलनेत नव्वद रुपयांहून अधिक झाला आहे. रुपयाचा भाव घसरल्याने सोन्याच्या आयात मूल्यात (Gold rate news) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी भारताला मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने सोन्याच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच आठवड्यात सोन्याचे दर हे जीएसटीसह 126000 हजारावरु 131000 वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट मात्र बिघडणार आहे. (Gold latest price)
Gold price prediction: 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार?
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या एका नोटमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांच्या दरम्यान होता. 4 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 127850 रुपये तोळा झाला आहे. सोन्याचे दर सध्याच्या स्तरावरुन 15 ते 30 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवला आहे. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127000 ते 130000 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 30 टक्क्यांची वाढ म्हणजे. साधारणपणे 35 हजार ते 40 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
Indian rupee vs Dollar: भारतीय रुपयाच्या दरात मोठी घसरण
गुरुवारी दिवसभरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 90.43 या पातळीपर्यंत खाली घसरला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबामुळे रुपयाला फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. रुपया कमकुवत झाल्याने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा खर्च वाढला आहे. अखेर काल रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपाच्या बातम्यांमुळे काल रुपया 19 पैशांनी वाढून 89.96 या पातळीवर बंद झाला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.