29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यंदा किती वाढणार?

सोन्याच्या किमतीच्या बातम्या : दरवर्षी अक्षय तृतीयाला लोक मोठ्या प्रमामात सोन्याची खरेदी करतात. यावर्षी 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे.यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होण्याची शक्यता आहे.   कारण सोन्यात केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. दरम्यान, गेल्या नऊ वर्षांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की अक्षय तृतीयेच्या आसपास सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळं गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. 2025 मध्ये अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. एकूणच, गेल्या नऊ वर्षांत सोने अधिक महाग झाले आहे. आजही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हा दिवस सोने खरेदीसाठी चांगला काळ आहे, कारण जागतिक अनिश्चितता सोन्याच्या किमती मजबूत ठेवेल.

गेल्या नऊ वर्षांपासून अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. ज्यांनी या सणात सोने खरेदी केले आहे, त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळाला आहे. नऊ वर्षांपूर्वी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 29000 रुपये होता, आणि आता तो 150000 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. 2025 मध्ये, अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 95000 ते 100000 रुपये होता. दरम्यान, यावर्षी देखील अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यानं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

अक्षय तृतीयेला सोने खरेदी

या वर्षीही, अक्षय तृतीया सोने खरेदीसाठी एक उत्तम वेळ मानली जाते. अनेक विश्लेषकांच्या मते, येत्या काही महिन्यांत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 180000 पर्यंत पोहोचू शकतात, जी सध्याच्या पातळीपेक्षा 10 ते 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ असू शकते. कमोडिटी तज्ञांच्या मते, जागतिक अशांतता, युद्धसदृश परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी वाढेल. त्यांच्या अंदाजानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होईल आणि एका वर्षाच्या आत भाव 180000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात का वाढ होतेय का?

जागतिक स्तरावर डॉलरचा वापर कमी होणे आणि अमेरिकेच्या कर्जाच्या चिंतेमुळे सोने एक सुरक्षित गुंतवणूक बनले आहे. भारतात, धनतेरस आणि अक्षय तृतीयेसारख्या सणांच्या वेळी सोन्याची मागणी नेहमीच जास्त असते, ज्यामुळे भावांना आणखी आधार मिळतो. तज्ञ आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करण्याची शिफारस करतात. ते दीर्घकाळात चांगला परतावा देते आणि जोखीम कमी करते. मात्र, किमतींमध्ये चढ-उतार होऊ शकतो, म्हणून कमी प्रमाणात खरेदी करा आणि दीर्घ कालावधीसाठी ठेवा.

आणखी वाचा

Comments are closed.