सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची वाढ, अमेरिकेच्या टॅरीफचा परिणाम, आणखी दरवाढीच्या अंदाज
सोन्याच्या किंमतीच्या बातम्या: अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरीफचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे 1 लाख 07 हजार रुपयांच्यावर जाऊन पोहोचले आहेत. अजूनही सोन्याच्या दरवाढीचा अंदाज असल्यानं अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी आज गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
वाढलेल्या सोन्याच्या दराने जीएसटी सह 1 लाख 7 हजार रुपयांचा टप्पा गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी काळात सोन्याचे दर अजूनही वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील काळात लग्न सराई असलेल्या अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम यांनी भारतावर लावलेल्या टॅरीफमुळे रुपयाचा तुलनेत डॉलर वधारला आणि रुपया घसरला आहे. सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचं सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत.
सोन्याचे दर कसे ठरतात?
सोने आणि चांदीचे दर जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या आधारे ठरतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकेनं डॉलरमध्ये ठरतात. डॉलर-रुपया विनिमय दरात तेजी आणि घसरण यावर भारतातील सोन्याचे दर ठरतात. जर डॉलर महागला आणि रुपया कमजोर झाला तर भारतात सोने आणि चांदीचे दर कमी होतात. भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. सीमा शुल्क, वस्तू आणि सेवा कर यासह इतर स्थानिक करांचा समावेश आहे. जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरता, युद्ध, मंदी आणि व्याज दरातील बदल या परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात.
सोन्याची मागणी वाढल्यास किंमत वाढते
सोन्याची मागणी वाढल्यास किंमत वाढते. भारतात सोन्याचं सांस्कृतिक महत्त्व आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते. महागाईच्या काळात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय मानला जातो. दरम्यान, जागतिक अस्थिरता आणि आर्थिक दबावामुळं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं आहे. यामुळं सोने दरातील तेजी वाढत आहे.रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्यानं अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावलं आहे. अमेरिकेनं भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात गसरण पाहायला मिळाली. निर्यातदारांमध्ये देखील अनिश्चिततेचं वातावरण आहे. तसेच सोन्याच्या दरातवर देखील परिणामझाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gold Rate Update : सोनं खरेदी करावं की विकावं? गेल्या 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण, सप्टेंबरमध्ये दर किती रुपयांपर्यंत पोहोचणार?
आणखी वाचा
Comments are closed.