Gold Price Today – सोन्याचे दराने मोडले सर्व रेकॉर्ड, मुंबईत 87000 च्या पार!; चांदीही चकाकली

सोनेच्या दराने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत प्रचंड उसळी घेतली आहे. त्यासोबतच चांदीचेही भाव वाढले आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यातील करवाढीच्या लढाईमुळे सोनेचे दर वाढले आहेत. बाजारातील अनिश्चिततेमुळे सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोने आणि चांदीत गुंतवणूक करत आहेत. यामुळे सोने-चांदीचे दर सतत वाढत आहेत.
मिळाली आहे.

मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये सोनेचा भाव आज वाढलेला दिसला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 84 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एसीएक्सवर सोन्याचा दर 84252 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर मंगळवारी 85800 रुपये होता. सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

सोन्याच्या दराने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मुंबईत सोन्याचा भाव 87 हजारांच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासांत एक हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 87550 रुपयांवर आहे. म्हणजेच मुंबईत 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव हा 8755 रुपये इतका आहे. तर चांदीचाही भाव वाढला आहे. मुंबईत चांदीचा भाव 1,00,800 रुपये प्रति किलो आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याच्या चांदीचा एक किलोचा दर 95826 रुपयांवर पोहोचला आहे.

Comments are closed.