सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, कारण काय? 10 ग्रॅमसाठी…
आज सोन्याचे भाव: गेल्या 24 तासात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय .जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने मोठी वाढ होताना दिसतेय . हे दर 1 लाख 35 हजार एवढ्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले होते . गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत .गेल्या 24 तासात जळगावच्या सराफा बाजारात एक लाख 22 हजार 500 रुपयांवरून सोन्याचा दर एक लाख 18 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे . (Gold rates)
अमेरिकेचा अर्थव्यवस्थेबाबत मिळत असलेल्या नव्या संख्येतांमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचे दर घसरले आहेत .मंगळवारी सोन्याच्या दारात मोठी घसरण झाली .
Gold Rates Today:राज्यभरात सध्या सोन्याचा दर किती ?
बुलियन असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा दर 1 लाख 20 हजार 380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे .तर किलोमागे चांदी एक लाख 46 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे .
24 कॅरेट सोने : ₹ 1,20,380 (प्रति 10 ग्रॅम )
22 कॅरेट सोने : ₹ 1,10,348
18 कॅरेट सोने : ₹ 90,285
तोळ्यामागे 24 कॅरेट सोने 1 लाख 40 हजार 409 रुपयांवर पोहोचले आहे .
गेल्या जवळपास वर्षभरापासून सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत आहेत . जागतिक अस्थिरता, अमेरिकेचे टॅरिफ कर, युद्धजन्य परिस्थिती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांचा कल सोन्यात गुंतवणूक करण्याकडे आहे . परिणामी या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असल्याचे दिसून येत आहे .
सोन्याच्या दरामध्ये चढ -उतार कशामुळे ?
– अमेरिका आणि चीन मधील ट्रेडवर संदर्भात उद्या दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होण्याची चिन्हे असल्याने शेअर बाजार उंचीवर गेलाय .यामुळेच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे . अमेरिका आणि चीनमध्ये होणाऱ्या या बैठकीत दोन्ही देशात नेमकं काय निर्णय होतो यावर आगामी काळातील सोन्याच्या किमतीत वाढ होणार की घट होणार हे ठरणार आहे .त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे .
– विटी मार्केटचे ग्लोबल स्ट्रॅटेजी लीड रॉस मॅक्सवेल यांनी बॉंड हिल्स मध्ये वाढ झाल्याने आणि राजनैतिक तणाव कमी झाल्याने सोन्याकडील आकर्षण कमी झालं असल्याचं म्हटलं . ज्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसूल करणे सुरू केलं आहे .
-सोन्याचे दर जरी घटले असले तरी ते 50% हून अधिक आहेत .केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली मोठी खरेदी, राजकोषीय तोट्या संदर्भातील चिंता, चलन जोखीम आणि जागतिक अनिशीतता यामुळे सोने दर वाढले आहेत .
आणखी वाचा
Comments are closed.