डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टेरीफ लावला; जळगावात सोन्याचा भाव चकाकला, ग्राहकांचं बजेट बिघडल

सोन्याच्या किंमती: काही दिवसांपूर्वी इराण-इस्त्रायल युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली असून, दर हे लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

सध्या जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 99,800 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. जीएसटीशिवाय दर 97,000 रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी सामान्य ग्राहकांसह लग्नसराईतील खरेदी करणाऱ्यांनाही आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे. (Jalgaon Gold Rates)

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे बाजारात चढउतार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टेरिफ दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली असून त्यामुळे मागणी वाढली आणि दर वधारले आहेत.

युद्धविरामामुळे घसरण, आता पुन्हा उसळी

इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात काही काळासाठी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. यानंतर सोन्याचे दर जवळपास 2,200 रुपयांनी घसरले होते. दर हे घटून 96,000 रुपयांपर्यंत आले होते, ज्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र ट्रम्प यांच्या नव्या टेरिफ धोरणामुळे ही घसरण फार काळ टिकली नाही. आता पुन्हा एकदा दराने झपाट्याने वाढ घेतली असून, बाजारात अस्थिरता कायम आहे.

ग्राहक चिंतेत, सराफा व्यावसायिक उत्सुक

सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी सध्या खरेदी थांबवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अनेकांनी दर स्थिर होईपर्यंत वाट पाहण्याचं ठरवलं आहे. दुसरीकडे सराफा व्यावसायिक मात्र ट्रेंडकडे लक्ष ठेवून आहेत. दर वाढत राहिल्यास नफा मिळण्याची शक्यता त्यांच्यासाठी वाढली आहे.जागतिक घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारांवर होताना पुन्हा एकदा दिसून आला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने सोन्याचा बाजार ढवळून निघाला असून, पुढील काही दिवसांत दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

12 देशांना आयात शुल्काबाबत पत्र

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नव्या आयात शुल्कासंबंधी 12 देशांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये या देशांवर लावण्यात आलेल्या नव्या आयात शुल्काची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेकडून लावण्यात आलेले नवे आयात शुल्क हे देश स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा:

ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, भारतासह BRICS देशांनाही इशारा

आणखी वाचा

Comments are closed.