दसऱ्याच्या आधीच सोन्या-चांदीला झळाळी; जाणून घ्या आजचे दर…

दसरा- दिवाळीला आपल्याकडे सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र, या वर्षात सोन्याच्या किंमती गगनाला भिजल्या असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. आता दसऱ्याच्या आदल्या दिवशीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दसऱ्यापूर्वी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. बुधवारी १ ऑक्टोबर २०२५ रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ११६,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. चांदी देखील प्रति किलोग्रॅम १४४,००० रुपयांच्या वर व्यवहार करत आहे.

सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याची किंमत मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्रति 10 ग्रॅम 105,660 रुपये होती आणि १ ऑक्टोबर रोजी सकाळी ती १०६,७९३ रुपयांवर पोहोचली आहे. एका दिवसात त्यात १,२३७ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. चादीनेही १४४,००० चा टप्पा गाठला आहे. त्यात एका दिवसात 1,691रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे दरात एका दिवसात झालेली वाढ

मंगळवारचे दर              बुधवारचे दर
सोने (प्रति १० ग्रॅम) (२४-कॅरेट)           ११५,३४९                   ११६,५८६
सोने (प्रति १० ग्रॅम) (२३-कॅरेट)           ११४,८८७                   ११६,११९
सोने (प्रति १० ग्रॅम) (२२-कॅरेट)           १०५,६६०                   १०६,७९३
सोने (प्रति १० ग्रॅम) (१८-कॅरेट)           ८६,५१२                     ८७,४४०
सोने (प्रति १० ग्रॅम) (१४-कॅरेट)          ६७,४७९                    ६८,२०३
चांदी (प्रति 1 किलो) 9172637 17125

मंगळवारी सकाळी सोन्याचे भाव वाढले आणि चांदीचे भावही वाढले. तथापि, संध्याकाळी सोने आणि चांदीचे भाव घसरले. २४ कॅरेट सोन्याचा भाव सकाळी ११६,९०३ रुपये होता, जो संध्याकाळी प्रति १० ग्रॅम ११५,३४९ रुपये झाला. दरम्यान, चांदीचा भाव ₹१४५,०६० वरून प्रति किलो १४२,४३४ रुपये झाला. मात्र, बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. अमेरिकेत शट डाऊनच्या संकटामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Comments are closed.