सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात 2025 या वर्षात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीला जागतिक स्तरावरील विविध देशांमधील वादांमुळं निर्माण झालेल्या घडामोडी आणि व्यापारी तणाव कारणीभूत आहे.  2025 हे वर्ष ट्रम्प यांच्या टॅरिफमुळं गाजलं आहे.  2025 मध्ये सोने 75913 रुपयांनी महागली आहे. चांदीच्या दरात देखील वर्षभरात 167 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानं ते सर्वसामान्यांच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज इंडियाच्या आकडेवारीनुसार अहमदाबादमध्ये सोन्याची किंमत 31 डिसेंबर  2024 ला  75913 रुपये होती.  26 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचे दर  137591 रुपयांवर पोहोचले आहेत.

चांदीचे दर 2025 मध्ये  167 टक्क्यांनी वाढले आहेत. चांदीचे दर 31 डिसेंबरला 85851 रुपयांवर होते. 26 डिसेंबर 2025 ला चांदीचा दर 228948 रुपये किलोवर पोहोचला आहे.

सोने आणि चांदीच्या दरातील दरवाढ तज्ज्ञांच्या मतानुसार जागतिक कारणांमुळं हे घडलं आहे.  रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरुच आहे. दुसरीकडे पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षामुळं गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळवला आहे. याशिवाय व्यापारी तणाव हे देखील एक कारण आहे. विविध देशांमधील जागतिक बँकांकडून देखील सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.

सोन्याच्या दरात वाढ झालेली  असताना सोन्याच्या मागणीत थोडीशी घट झालेली आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलनं सोने आणि चांदीच्या दरवाढीला जागतिक कारणांसह देशांतर्गत सणांच्या काळातील मागणी आणि लग्नसराईनिमित्त केली जाणारी खरेदी कारणीभूत असल्याचं म्हटलंय. सोन्यातील वाढत्या किमतीमुळं गुंतवणुकीची मागणी वाढलेली आहे. नव्या वर्षात देखील सोन्याचे दर वाढू शकतात.

राजेश रोकडे यांच्या मते  2025 मध्ये सोने आणि चांदी धोरणात्मक संपत्ती असल्याचं अधोरेखित झालं आहे. सोन्याच्या दरातील वाढते तेजी भारतीय कुटुंबांचा सोन्यावरील वाढता विश्वास दाखवतं. दुसरीकडे चांदीचा औद्योगिक वापर वाढलेला आहे. सौर ऊर्जा उपकरणं, नवीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळं  चांदीच्या दरात तेजी आली आहे.

जागतिक स्तरावर लंडन बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर 70.7 टक्क्यांनी वाढून  4482 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. चांदी देखील 135 टक्क्यांच्या तेजीसह 69.22 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यानं भारतात सोनं आणि चांदीच्या दरात देखील वाढ झालीय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.