Gold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर कमी होणार का? तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?
नवी दिल्ली : अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोन्याचे दर 1 लाखांच्या वर गेले आहेत.गेल्या आठवड्यात 22 एप्रिलला देखील सोन्याचे दर 1 लाखांच्या वर गेले होते. अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं सोने आणि चांदी खरेदी करणं चांगलं मानलं जातं. गेल्या दोन वर्षात अक्षय्य तृतीयेला ज्यांनी सोनं खरेदी केलं असेल त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळं यंदा देखील अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचा उत्साह कायम आहे.
जेम अँड ज्वेलरी काऊन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश रोकडे यांनी एएनआय सोबत बालताना म्हटलं की गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्यानं 20-25 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळं लोकांचा सोन्यामधील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. ते म्हणाले 2024 मध्ये अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 72000 रुपये इतका होता. तर, 2023 मध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 58000 रुपये इतका होता. सोन्यामधील गुंतवणुकीमुळं गेल्या दोन वर्षांमध्ये साधारणपणे 20-25 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. यामुळं सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरत आहे.
राजेश रोकडे पुढं म्हणाले की 2024 मध्ये भारतानं 802 टन सोनं आयात केलं आहे. 2023 मध्ये भारतानं 741 टन सोनं आयात केलं होतं. सोन्याचे दर वाढत असले तरी मागणी देखील वाढत आहे. ज्वेलर्सकडून आगामी हंगामाची तयारी केली जात आहे. पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी म्हटलं की अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामामुळं मागणी वाढली आहे. यादरम्यान सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळं स्टड ज्वेलरीची मागणी वाढू शकते, असं सांगण्यात आलं. ग्राहकांकडून जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करत आहेत.
कमोडिटी विश्लेषकांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरातील वाढ सुरु आहे. मात्र, येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचेदर कमी होऊ शकतात. केडिया एडवायजरीचे संचालक अजय केडिया यांनी म्हटलं की गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेनंतर सोन्यातील गुंतवणूकीनं 32 टक्के परतावा दिला आहे. मात्र, सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा लग्नसराई यासारख्या कारणासाठी सोनं खरेदी कराव. महागाईचा विचार केला असता त्यातून मिळणारा परतावा 6 ते 7 टक्के असू शकतो. यामुळं सोन्याचे दर 86000 ते 87000 रुपयांच्या दरम्यान राहू शकतात अशी अपेक्षा आहे.
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर; जाणून घ्या, आजचा दर
अधिक पाहा..
Comments are closed.