सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या
नवी दिल्ली : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर या आठवड्यात सोन्याचे दर कशाप्रकारे बदलले याची माहिती घेणं आवश्यक आहे. सोन्याचे दर वाढले की घसरले याची माहिती सोने खरेदी करण्यापूर्वी माहिती असावी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लावण्याची घोषणा केली. यामुळं वाढलेल्या दबावामुळं आणि चिंतेमुळं शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. तर सोन्याचे दर एकदा वाढलेले पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरीव सोन्याच्या दरांचा आढावा घेतला असता असं दिसून आलं की 25 जुलै रोजी 3 ऑक्टोबरच्या वायद्याच्या सोन्याचे 24 कॅरेट सोन्याचे दर 98748 रुपये होते. यानंतर त्यामध्ये तेजी पाहायला मिळाली. पाच दिवसांच्या कारभारात सोन्याचे दर 987 रुपयांनी वाढले आहेत. शुक्रवारी सोन्याचे दर 99375 रुपये एक तोळा आहेत. जून महिन्यात सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा पार केला होता.त्यानंतर त्यामध्ये घसरण पाहायला मिळाली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर वाढले आहेत. तर, दुसरीकडे देशांतर्गत बाजारात दर घसरले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन नुसार 25 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 98388 रुपये होता. तर, शुक्रवारी हा दर 98253 रुपयांवर होता. म्हणजेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरील दर देशभर सारखेच असतात. मात्र, तुम्ही जेव्हा तुमच्या शहरात दागिने खरेदी करता तेव्हा त्यावर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. त्याशिवाय मेकिंग चार्ज देखील द्यावे लागतात. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 95890, 20 कॅरेटचा दर 87540, 18 कॅरेटचा दर 79580 आणि 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 63370 रुपये इतका आहे.
सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासणं सोपं असतं. सोन्याचे दागिणे बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिणे खरेदी करता त्यावेळी त्यावरील हॉलमार्कवरुन शुद्धता कळते. 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. 23 कॅरेट सोन्यावर 958,22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 आणि 18 कॅरेट सोन्यावर 750 अंक असतो.
आणखी वाचा
Comments are closed.