टॅरिफमुळे जगाची चिंता वाढली; सोने झाले पुन्हा लाखमोलाचे, चांदीचे दरही वाढले

जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत असतो. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली असून अनेक गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा एक लाखाचा टप्पा गाठला असून सोने लाकमोलाचे झाले आहे.

वाढत्या जागतिक अस्वस्थेतेमुळे सोन्याने पुन्हा एकदा एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. वायदे बाजारात आणि सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किंमतीने आता 1 लाखाच्या टप्पा ओलांडला आहे. तसेच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. एका दिवसात सोन्याचे किमती 230 रुपयांनी वाढल्या आहेत. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 995 शुद्धतेचे म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे आजचे मूल्य 99995 रुपये आहे, ते सोमवारी 99766 रुपये होते. तर 916 शुद्धतेचे म्हणजेच 22 कॅरेट सोने आज प्रति 10 ग्रॅम 91964 रुपयांना विकले जात आहे, जे काल 91753 रुपये होते. 750 शुद्धतेचे म्हणजे 18 कॅरेट सोन्याची किंमत आज 75298 रुपये आहे आणि 585 शुद्धतेचे म्हणजे 14 कॅरेट सोन्याची किंमत आज 58732 रुपये आहे.

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 112428 रुपये प्रति किलो आहे, जो सोमवारी 111900 रुपये होता. या किंमतीत जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे सोन्याच्या किमती आता एक लाखावर गेल्या आहेत.

Comments are closed.