सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, सोनं 1392 तर चांदी 4170 रुपयांनी महागली, जाणून घ्या सो
नवी दिल्ली : सर्राफा बाजारात सोने आणि चांदीचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2025 मध्ये सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. आता सणांचे दिवस सुरु होत असताना सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर तेजीत आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1392 रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदी देखील 4170 रुपयांनी महागली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 114502 रुपये तर चांदीचा दर 136135 रुपे किलो आहे.
सोने आणि चांदीच्या दरात वाढ का? Gold and Silver Rate Hike
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या दरात 0.1 टक्के वाढ होऊन ते 3688.76 डॉलर्स प्रति औंस झाली आङे. डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या यूएस गोल्ड फ्यूचर्समध्ये 0.5 टक्के वाढ होऊन ते 3773.70 डॉलर्स वर पोहोचले आहेत. स्पॉट चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 43.20 डॉलर प्रति औंस झाली आहे. हा गेल्या 14 वर्षातील उच्चांक आहे.
रिलायन्स सिक्यूरिटीजच्या वरिष्ठ शोध विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी म्हटलं की सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत याचं कारण गुंतवणूकदार येणाऱ्या आठवड्यातील अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि फेडरल रिझर्वहच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांकडे पाहत आहेत.
भूराजकीय तणाव असो किंवा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचे आर्थिक परिणाम यामुळं आणि केंद्रीय बँकांकडून होणारी मजबूत खरेदी यांमुळं सातत्यानं गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणक वाढत हे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेड रिझर्व्हनं व्याज दरात 25 बेसिस पॉईंटच्या कपातीचे संकेत दिले आहेत. गुंतवणूकदारांना या वर्षी दोन वेळा कपातीची अपेक्षा आहे. कपात ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये होईल अशी आशा आहे.
कमी व्याज दराच्या वातावरणात सोन्याचे दर वाढतात. याशिवाय या वर्षातील विविध देशातील संघर्ष, केंद्रीय बँकांकडून होणारी सोने खरेदी, मौद्रिक धोरणातील बदल यामुळं सोन्यानं 40 टक्के परतावा दिला आहे. काही जाणकारांच्या मते सोने आणि चांदीच्या दरातील तेजी थांबणार नाही.
सप्टेंबर महिन्यात 8779 रुपयानी सोनं महागलं आहे. तर, चांदीच्या दरात 14598 रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या रेटनुसार 31 ऑगस्टला सोन्याचे दर 102388 आण चांदीचे दर 117572 रुपये प्रति किलो होते. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात.
सोन्यातील गुंतवणूकदार मालामाल
सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. सोन्यात गुंतवणूक आर्थिक अस्थिरता, युद्ध सुरु असताना वाढते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय स्वीकारला. सोन्याचा 24 कॅरेटचा 31 डिसेंबरचा दर 76 हजारांच्या दरम्यान होता. सध्या तो 1 लाख 14 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.