चांदीच्या दरानं रचला नवा इतिहास! पहिल्यांदाच गाठला 2 लाखांचा टप्पा, सोन्याच्या दरातही वाढ

सोन्या-चांदीची किंमत: गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज 12 डिसेंबर रोजी चांदीच्या दराने 2 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. चांदीच्या दरानं नवीन विक्रम केला आहे.  या वर्षी चांदीच्या किंमती तब्बल 121 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदी 2 लाख 01 हजार 388  रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचली आहे. चांदीच्या किंमतीत झालेल्या या वाढीमुळे ती मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी मालमत्ता बनली आहे.

एमसीएक्सवर चांदीचा दर काय?

काल एमसीएक्सवर चांदीचा दर हा 1 लाख 98 हजार 942 वर बंद झाली होती. मात्र, आज एमसीएक्सवर, चांदी 2 लाख 699 रुपयांवर व्यवहार करत होती. आज चांदीच्या दरात तब्बल 1800 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरानं 2 लाख 01 हजार 388 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच किंमती 2 लाखाच्या वर पोहोचल्या आहेत.

चांदीच्या दरात का होत आहे वाढ?

बाजारातील तज्ञांचा असा विश्वास आहे की उच्च औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किंमती वाढत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, सौर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उद्योगांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे मागणी वाढली आहे.

सोन्याच्या किंमतीही वाढल्या

आज व्यापार दिवशी सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आज सोन्याचे दर एमसीएक्सवर 1 लाख 32 हजार 275  वर उघडला. ट्रेडिंग दिवसादरम्यान, सोन्याने 1 लाख 34 हजार 966 चा उच्चांक गाठला आहे. जो मागील दिवसाच्या तुलनेत अंदाजे 2400 ने वाढ दर्शवितो.

चांदीच्या दरवाढीचे कारणे

यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीचा भाव तुलनेने स्थिर होता; मात्र त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये जागतिक आर्थिक चढ-उतार, औद्योगिक मागणी, इलेक्ट्रॉनिक आणि सोलार उद्योगातील वाढती गरज, तसेच गुंतवणूकदारांकडून वाढलेला कल यामुळे चांदीच्या किमतींनी अक्षरशः झेप घेतली आहे. जानेवारीपासून आजपर्यंत चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 1 लाख 04 हजार रुपये प्रति किलो वाढ झाली. चांदीच्या तेजीमागे अनेक घटक कार्यरत असून त्यात सणासुदीची वाढती मागणी, औद्योगिक वापरातील वाढ आणि पुरवठ्यातील मर्यादा यांचा मोठा वाटा आहे. भारत हा जगातील प्रमुख चांदी ग्राहक देश असल्याने सणासुदीच्या काळात चांदीच्या मागणीत वाढ होत असते. यासोबतच सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये चांदीचा वाढता वापर, एआय संबंधित हार्डवेअर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात लागणाऱ्या चांदीच्या मागणीत झालेली झपाट्याने वाढ या सर्व कारणांनी चांदीच्या दरांना मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Silver Price Today: ऐन थंडीत चांदीचं मार्केट तापलं! एकाच दिवसात तब्बल 12 हजारांची उसळी, चांदीचा आजचा भाव किती?

आणखी वाचा

Comments are closed.