सोन्याचा पारा चढला ! चांदीच्या किमतीही वाढल्या, मुंबई – पुण्यात 10 ग्रॅममागे किती पैसे द्यावे ल

आज सोन्याच्या चांदीच्या किंमती: मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. मात्र आज, 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत हलकी वाढ नोंदवण्यात आली आहे. बुलियन मार्केट आणि एमसीएक्स दोन्ही ठिकाणी सोन्याचा दर वाढताना दिसत आहे. तर कालप्रमाणेच आजही चांदीची चमक कायम आहे.

बुलियनस मार्केटनुसार, आज सोन्याच्या किमती वाढल्या असून 10 ग्रॅममागे 1 लाख 440 रुपये खरेदीदारांना द्यावे लागणार आहेत .तर चांदीचा भाव किलो मागे 1 लाख 15 हजार 260 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे . दोन दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती .सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर झालेल्या 900 रुपयांच्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत .सतत चढ – उतार होणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींमुळे खरेदीदार साशंक आहेत . तज्ञांच्या मते भूराजकीय तणाव तसेच गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या होत्या .आता त्या पुन्हा वाढताना दिसत आहेत .

सोन्याचा आजचा भाव किती ?

24 कॅरेट सोन्यासाठी खरेदीदारांना आज 10 ग्रॅम मागे 1 लाख 440 रुपये द्यावे लागणार आहेत .तर 22 कॅरेट सोन्यासाठी 10 ग्रॅमचा दर हा 92 हजार 70 रुपये एवढा झालाय. 24 तासांपूर्वी 24 कॅरेट सोन्याला 1 लाख 70 रुपये मोजावे लागत होते . हा दर सध्याच्या घडीला एक लाख 440 रुपयांवर गेलाय .

चांदीच्या किमतींमध्ये ही वाढ

सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या किमती ही तुफान वाढल्या आहेत . किलोमागे चांदीचा दर 1 लाख 15 हजार 260 हजार  रुपये झालाय . 24 तासांपूर्वी हा दर 1 लाख 13 हजार 600 रुपये एवढा होता . ऑल इंडिया सरफा असोसिएशनच्या मते सोमवारी चांदीचा भाव 1000 रुपयांनी घसरून एक लाख 14 हजार रुपये प्रति किलो झाला होता .शुक्रवारी हाच भाव एक लाख 15 हजार रुपये प्रति किलोवर थांबला . गेल्या पाच दिवसात चांदीच्या भावात 5500 रुपयांनी वाढ झाली होती .आता पुन्हा एकदा चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत .

सोन्या चांदीच्या किमतींमध्ये चढ – उतार का ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या शेवटी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यास सहमती दर्शवल्याने भूराजकीय तणाव कमी झाल्याचे सांगितले जाते .याशिवाय सोन्याच्या बार वरील 39% शुल्क बाबत व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण आल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे .

आणखी वाचा

Comments are closed.