दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना दिलासा, सध्या सोन्या चांदीचे दर किती?
सोन्याचांदीचा दर : तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. एका दिवसापूर्वीच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असताना आज सोन्याच्या दरात घसरण दिसून आल आहे.. काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 630 रुपयांनी वाढून 82,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. हा दर आत्तापर्यंतचा उच्चांकी दर होता. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती झाली घसरण?
सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या वायदा किमतींमध्ये नरमता दिसून आली. आज दोन्हीच्या फ्युचर्स किमती घसरणीसह उघडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दरही कमी होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क फेब्रुवारी करार आज 145 रुपयांच्या घसरणीसह 79,419 रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 521 रुपयांच्या घसरणीसह 91423 रुपयांवर उघडला. जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किमती मंदावल्या आहेत.
सोन्यातील दरवाढीचा गुंतवणुकदारांना मोठा फायदा तर ग्राहकांना फटका
2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत झपाट्यानं वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सोन्यातील दरवाढीचा मोठा फायदा गुंतवणुकदारांना झाला होता. मात्र, ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, 2025 मध्ये देखील अशीच सोन्याच्या दरात वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. युरोप आणि मध्यपूर्वेतील तणावाबरोबरच जागतिक चलनवाढीमुळं 2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोन्याच्या किंमतीवर अनेक कारणांचा परिणाम होतो. त्यापैकी जागतिक अर्थव्यवस्था, चलनवाढ, राजकीय कारणे, मागणी पुरवठ्यातील तफावत ही प्रमुख कारणे आहेत.
2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
2025 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते, कारण, भारतात सण आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. मागणी वाढेल, त्यामुळं किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, जगातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. सध्या देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्याच्या किंमतीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो. अमेरिका आणि युरोपमधील चलनवाढ आणि बँकांच्या धोरणांचा यावर परिणाम होईल.
महत्वाच्या बातम्या:
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती?
अधिक पाहा..
Comments are closed.