चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
सोन्याचांदीचा दर नवी दिल्ली : भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात आज 4034 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 178684 रुपये किलो इतका आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 184044 रुपये आहे. कालचा 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 127593 रुपयांवर होता. त्यात आज वाढ झाली आहे.
Gold Rate : सोन्याचा दर किती रुपयांवर पोहोचला?
24 कॅरेट सोसन्याच्या दरात 957 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 128550 रुपयांवर पपोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा दर 121284 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 99305 रुपये झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 132406 रुपये झाला आहे.
सोन्याच्या दरानं 17 ऑक्टोबरला उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सोनं 2324 रुपयांनी सध्या स्वस्त मिळतंय. 17 ऑक्टोबरला सोन्याचा दर 130874 रुपयांवर पोहोचले होते.
23 कॅरेट सोन्याच्या दरात 953 रुपयांची वाढ होऊन ते 128035 रुपयांवर पोहोचलं. जीएसटीसह याचा दर 131876 रुपये इतका झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 877 रुपयांची वाढ झाली. जीएसटीशिवाय हे दर 117752 रुपये इतके आहेत. तर, जीएसटीसह याचा दर 121284 रुपये झाला आहे.
दुसरीकडे 18 कॅरेट सोन्याच्या दरात 718 रुपयांची वाढ होऊन ते 96413 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह याचा दर 77458 रुपये इतका झाला आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 560 रुपयांनी वाढू 77458 रुपये इतका झाला आहे.
विशेष बाब म्हणजे 2025 मध्ये सोन्याचा दर 52810 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीच्या दरात 92667 रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान,इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता सोन्याचे दर जाहीर केले जातात.
सोन्यातील गुंतवणूकदार मालामाल
2025 हे वर्ष सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरलं आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय शोधत असतात. सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. चांदीच्या दरात देखील 2025 मध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक पुरवठा कमी होत असल्यानं आणि चांदीचा औद्योगिक कारणांसाठीचा वापर वाढल्यानं यंदा चांदीचे दर वाढले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार रुपयांवर होता. तर, चांदीचा एका किलोचा दर 86000 रुपयांवर होता.
आणखी वाचा
Comments are closed.