सोने 1175 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर, चांदीचे दर 5835 रुपयांनी घसरले

नवी दिल्ली : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचा पाहायला मिळालं आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 1175 रुपयांनी कमी होऊन 156147 रुपये प्रति एक तोळा झाले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून चांदीचे दर  5835 रुपयांनी कमी होऊन 260614 रुपये किलोवर आले आहेत. एक किलो चांदीचा जीएसटीसह दर 268432 रुपये इतका आहे.

सराफा बाजारात सोने 176121 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचलं होतं, त्या तुलनेत सध्या सोनं  19974 रुपये स्वस्त आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 160831 रुपये तोळा आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर 1076 रुपयांनी कमी होऊन 143031 रुपये तोळा झाला आहे. तर, जीएसटीसह याचा दर 147321 रुपये इतका आहे. तर, 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 1170 रुपयांची घसरण झाली असून  एक तोळे सोन्याचा दर 155522 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 882 रुपयांनी कमी होऊन 117110 रुपये तोळा झाला आहे. तर, जीएसटीसह याचा दर 120623 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 687  रुपयांनी कमी होऊन 91346 रुपये तोळा झाला आहे.

Silver Rate: चांदीच्या दरात घसरण कायम

गेल्या वर्षभरात चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहेत. चांदीच्या दरात 5835 रुपयांची घसरण होऊन ते 260614 रुपये किलोवर पोहोचले आहेत. जीएसटीसह ही रक्कम 268432 रुपये होते. 29 जानेवारीला चांदीच्या दरानं  385933 रुपयांचा उच्चांक सराफा बाजारात गाठला होता. त्या तुलनेत चांदी सध्या 125319 रुपये स्वस्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेमधील जानेवारी महिन्यातील रोजगाराचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्यानं डॉलर मजबूत झाला आहे. यामुळं फेड रिझर्व्ह आगामी काळात व्याज दरात कपात करण्याची अपेक्षा धूसर झाली आहे. यामुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

दरम्यान, सोने आणि चांदीमध्ये गेल्या वर्षात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे. भारत आणि अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाली आहे. दुसरीकडे भूराजकीय तणाव देखील कमी होत असल्याचं चित्र असल्यानं गुंतवणूकदार पुन्हा एकदा भांडवली बाजाराकडे वळत असल्याचं दिसतं. जेव्हा भूराजनैतिक अस्थिरता असते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. यामुळं सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं होतं.

आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक वापरासाठी चांदीचा वापर वाढल्यानं चांदीचे दर वाढले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात घसरण झाली.

आणखी वाचा

Comments are closed.