नववर्षात चांदी 52000 रुपयांनी महागली, सोन्याचा आजचा दर काय? 22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली : 2026 मध्ये सोने आणि चांदीच्या दरातील वाढ 2025 प्रमाणेच सुरु आहे. 2026 मध्ये देखील सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ कायम आहे. आज (14 जानेवारी) चांदीच्या दरात 12000 रुपयांची वाढ झाली आहे. तर, सोन्याच्या दरात देखील जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग स्वीकारल्याचं दिसून येतं.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर कामकाज सुरु होताच मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. 5 मार्चला संपणाऱ्या वायद्याच्या चांदीचे दर 12803 रुपयांनी वाढले आहेत.मंगळवारी चांदीचे वायद्याचे दर 275187 रुपये किलोवर पोहोचले होते. आज चांदीचे दर 287990  रुपयांवर पोहोचले आहेत.

चांदीच्या वायदेबाजारातील 10 दिवसातील तेजीचा विचार केला असता 52117 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारीला चांदीच्या वायद्याची किंमत 235873 रुपये किलो होती. बुधवारी चांदीच्या वायद्याचे दर 287990 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसात चांदीचे दर 19020 रुपयांनी वाढले आहेत.

सोन्याचे दर देखील वेगानं वाढत आहेत. गेल्या 10 दिवसात सोन्याचे दर 7369 रुपयांनी वाढले आहेत. 1 जानेवारी 2026 ला 24 कॅरेट सोन्याचा दर 135804 रुपये एक तोळा होता. बुधवारी सोन्याचे दर 832 रुपयांनी वाढून 143173 रुपयांवर पोहोचले आहेत.

सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर

सराफा बाजारात चांदीचे दर 14143 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं चांदीचा जीएसटीशिवायचा दर 277175 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीचा दर 285490 रुपये आहे. तर, सोन्याचा दर आज 1868 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचा जीएसटीशिवायचा दर 142152 रुपयांवर पोहोचला आहे. तर, जीएसटीसह दर 146416 रुपयांवर पोहोचला आहे.

आज  23 कॅरेट सोन्याचे दर 1861 रुपयांनी वाढून 141583 रुपये प्रति तोळा झाले आहेत. जीएसटीसह याचा दर 145830 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर  1711 रुपयांनी वाढून 130211 रुपये प्रति तोळा झाले आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 1401 रुपयांनी वाढून  106614 झाले आहेत. 14 कॅरेट सोन्याचा दर  1093 रुपयांनी वाढून 85653 रुपये झाला आहे. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवायचे आहेत.

सोने आणि चांदीच्या दरातील वाढीची कारणं?

सोने आणि चांदीच्या दरात 2026 मध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री केली जाणं आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानं सोने आणि चांदीचे दर वेगात वाढत आहेत. जागतिक राजकारणात संघर्ष निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात. सोने दरात वाढ झाल्यानं ज्यांनी गुंतवणूक केलीय त्यांना चांगला परतावा मिळाला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.