चांदीची चमक फिकी पडली, सोने झळाळले
चार लाखांच्या जवळपास पोहोचलेल्या चांदीचा भाव आता अडीच लाखांच्या खाली आला आहे. मागील तीन दिवसांपासून चांदी स्वस्त झाली आहे. सोमवारी एक किलो चांदीची किंमत 2 हजार 949 रुपयांनी घसरून 2 लाख 39 हजार 484 रुपयांपर्यंत खाली आली आहे. शुक्रवारी चांदीची किंमत 2 लाख 42 हजार 433 रुपये होती. चांदी स्वस्त झाली असली तरी सोन्याच्या किंमतीत मात्र वाढ झाली आहे. सोने 1315 रुपयांनी वाढून 1 लाख 54 हजार रुपये तोळा झाले आहे. सराफा बाजारात 29 जानेवारीला सोने 1 लाख 76 हजार 121 रुपये तर चांदी 3 लाख 85 हजार 933 रुपये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते.
Comments are closed.