सबरीमाला मंदिरातून कोटी डॉलर्सची सोन्याची
उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळच्या प्रसिद्ध शबरीमाला मंदिरातून कोट्यावधी रुपयांचे सोने गूढपणे गायब झाले आहे. मंदिर प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच गोंधळ उडाला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले असून न्यायमूर्तींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तीन आठवड्यांत अहवाल मागितला असून त्रावणकोर देवस्वोम बोर्डाला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोने गायब होण्याचे हे प्रकरण मंदिराच्या सोन्याच्या मुलामा देण्याच्या कामाशी संबंधित आहे. 2019 मध्ये शबरीमाला मंदिराच्या गर्भगृहावर (सन्निधानम) सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरू झाले. यासाठी मंदिरातून सुमारे 42 किलो सोने नेण्यात आले.
योजनेनुसार, या सोन्याच्या प्लेट्स एका विशेष प्रक्रियेचा वापर करून पुन्हा प्लेट केल्यानंतर गर्भगृहात पुन्हा स्थापित केल्या जाणार होत्या. तथापि, जेव्हा प्लेट्स परत आणून मंदिरात स्थापित केल्यानंतर एक धक्कादायक सत्य उघड झाले. या सोन्याचे एकंदर वजन सुमारे 38 किलोपर्यंत कमी झाले होते. म्हणजेच अंदाजे 4.45 किलो सोने गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. केरळ उच्च न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेत जर हे पेट्रोल असते तर वजन कमी होणे समजण्यासारखे आहे, परंतु हे सोने आहे. त्याचे वजन कसे कमी झाले? असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिरांशी संबंधित श्रद्धा आणि पारदर्शकतेशी तडजोड करता येणार नाही असे सांगत न्यायालयाने देवस्वोम व्हिजिलन्सकडून चौकशीचे आदेश दिले.
मंदिरातील अन्य संरचनांचीही तपासणी होणार
उच्च न्यायालयाने केवळ सोन्याच्या प्लेटिंगमधील अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर द्वारपालक मूर्ती आणि मंदिरातील इतर संरचनांच्या सुरक्षेची त्वरित तपासणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने या सर्व वस्तू स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितपणे ठेवल्या आहेत याची खात्री करण्यास सांगितले. शबरीमाला मंदिरात सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकल्प वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या प्रकल्पाच्या खर्चाबाबत आणि अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता चार किलो सोन्याच्या गूढ कमतरतेमुळे मंदिर प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Comments are closed.