या संघासाठी आनंदाची बातमी! हा फलंदाज IPL मध्ये करू शकतो शानदार कामगिरी!

आगामी आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. दुखापत झालेला एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करण्यासाठी एकदम फिट आहे, असे फिजियो कडून घोषित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार मिचेल मार्शला आयपीएल स्पर्धेत फलंदाज म्हणून खेळण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकला नाही. तसेच आयपीएल स्पर्धेसाठी तो पुढच्या आठवड्यात भारतामध्ये येणार आहे.

31 जानेवारी रोजी पाठीच्या खालच्या बाजूमध्ये दुखत असल्यामुळे तो श्रीलंका विरुद्ध वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडला होता. असं मानलं जात होतं की, सप्टेंबर 2024 पासूनच त्याला ही समस्या होत होती.

मार्शने फेब्रुवारीमध्ये आराम करण्याचा निर्णय घेतला आणि आता मागच्या आठवड्यापासून त्याने फलंदाजीचा अभ्यास सुरू केला आहे. तसेच आगामी आयपीएल स्पर्धेत त्याला फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची परवानगी मिळालेली आहे. अशातच लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी या हंगामात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तो खेळताना दिसू शकतो. लखनऊने मागच्या हंगामात मेगा लीलावात त्याला 3.40 करोड रुपयांना खरेदी केले होते. तसेच येत्या 18 मार्च रोजी लखनऊ संघात तो सामील होईल. माजी ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्स प्रशिक्षक जस्टिन लेंगर सुद्धा त्यांच्यात सामील आहेत. ते सलग दुसऱ्या वर्षी लखनऊ साठी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.

मार्शने 7 जानेवारी नंतर कोणताही सामना खेळलेला नाही. यानंतर त्याला पर्थ स्कॉर्चर्सच्या अंतिम दोन सामन्यापूर्वी आराम देण्यात आला होता. मार्श मागच्या तीन आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत होता आणि तीनही हंगामामध्ये दुखापतीने त्याचा पिछा सोडला नाही. तसेच मागच्या हंगामात 4 सामने खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्यातून बरा होण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला परत गेला होता. याचबरोबर तो अनेक संघांमध्ये खेळला आहे. तसेच पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवोड हेही खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. दुखापतीच्या कारणाने हे खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून लांब होते.

Comments are closed.