श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas iyer) धोकादायक दुखापतीमुळे सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये रुग्णालयात दाखल आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली असून, त्यामुळेच त्याला आयसीयूतून बाहेर काढण्यात आले आहे. दीर्घ काळानंतर आता अय्यरच्या चाहत्यांना ऑस्ट्रेलियातून एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनी चाहत्यांना खुशखबर देत सांगितले आहे की, श्रेयस अय्यर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीपर्यंत पुनरागमन करू शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी अय्यरच्या फिटनेसविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले, श्रेयस अय्यरची तब्येत आता खूपच सुधारली आहे. डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा त्याची प्रकृती वेगाने सुधरत आहे. मी भारतीय संघाचे डॉक्टर रिजवान खान (जे सिडनीच्या रुग्णालयात अय्यरच्या उपचारासाठी थांबले आहेत) यांच्या सतत संपर्कात आहे. सामान्यतः अशा दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागतात, पण अय्यरच्या बाबतीत तो आश्चर्यकारकरित्या लवकर बरा होऊ शकतो.

सैकिया पुढे म्हणाले, डॉक्टर त्याच्या प्रगतीबद्दल खूप समाधानी आहेत. अय्यरने आता आपले दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू केले आहे. त्याची दुखापत गंभीर होती, पण आता तो पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. त्यामुळेच त्याला काल आयसीयूतून सामान्य रूममध्ये हलवण्यात आलं आहे.

श्रेयसची सर्जरी करण्यात आलेली नाही, तर एक विशेष वैद्यकीय प्रक्रिया वापरून उपचार झाले, ज्यामुळे तो एवढ्या लवकर बरा झाला.
बीसीसीआयने श्रेयसला सर्वतोपरी मदत केली असून, डॉक्टर रिजवान खान (Rijwan Khan) त्याच्या उपचारांवर आणि रिकव्हरीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. श्रेयसला सिडनीतील सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटल, जे शहरातील सर्वोत्तम रुग्णालय मानलं जातं, येथे दाखल करण्यात आलं आहे.

Comments are closed.