गुगल अटलांटिक महासागरा’चे नाव बदलणार नाही! अमेरिकेची विनंती सुंदर पिचाई यांनी फेटाळली
अमेरिकेत गुगलने ‘लेक ओंटारियो’ (Lake Ontario) चे नाव बदलून ‘लेक अमेरिका’ (Lake America) केल्यानंतर, आता अमेरिकन सरकारने ‘अटलांटिक महासागरा’चे (Atlantic Ocean) नाव बदलण्याची विनंती केली असता, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी ती फेटाळून लावली आहे. नाही, नाही, नाही… यावेळी मी असे करणार नाही, असे सांगत त्यांनी स्पष्ट शब्दांत अमेरिकी सरकारच्या विनंतीला नकरा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी ‘अटलांटिक महासागरा’चे नाव बदलून ‘ट्रम्प महासागर’ (Trump Ocean) करण्यासाठी गुगलला फोन केला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘अटलांटिक महासागरा’चे नाव बदलून ‘ट्रम्प महासागर’ ठेवण्याची कल्पना मांडली होती आणि आता त्यांनी पुन्हा एकदा हा विषय उपस्थित केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी ‘गुगल मॅप्स’ला (Google Maps) फोन करून अटलांटिक महासागराचे नाव बदलण्यास सांगितले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले, “नाही, नाही, नाही. यावेळी मी असे करणार नाही.
ट्रम्प यांना ‘अटलांटिक महासागरा’चे नाव बदलून ‘ट्रम्प महासागर’ ठेवायचे आहे. ट्रम्प यांनी या महिन्यात पहिल्यांदाच अटलांटिक महासागराचे नाव बदलण्याबाबत चर्चा केली होती. टेनेसीमधील क्लार्क्सविले येथे एका रॅलीदरम्यान ट्रम्प म्हणाले, “आपल्याकडे आखात (Gulf) आहे, एक सुंदर तलाव (Lake) आहे. आता कोणीतरी म्हटले की, आपल्याला एका नदीचीही गरज आहे. आपल्याला एक नदी हवी आहे, आणि एक महासागरही हवा आहे. मी पद सोडण्यापूर्वी, मला वाटतं की आपल्याकडे एक महासागर असायला हवा, असे ते म्हणाले.
ऑगस्टमध्ये, ट्रम्प यांनी न्यूयॉर्क आणि कॅनडा दरम्यान असलेल्या ओंटारियो सरोवराचे नाव बदलून “लेक अमेरिका” असे ठेवले होते. एका कार्यकारी आदेशानंतर, गूगलने आपल्या गूगल मॅप्स ब्लॉगवर एक संक्षिप्त अपडेट पोस्ट केले, ज्यात नमूद केले आहे की ते आपल्या नकाशांसाठी यूएस जिओग्राफिक नेम्स इन्फॉर्मेशन सिस्टीम (GNIS) चे अनुसरण करते. त्यामुळे कंपनीला गूगल मॅप्समध्ये ओंटारियो सरोवराचे नाव बदलावे लागेल. गूगलच्या नामबदलाच्या अपडेटमध्ये हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की हा बदल केवळ अमेरिकेतील गूगल मॅप वापरकर्त्यांसाठी असेल. गुगलच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील लोकांना फक्त ‘लेक ऑफ अमेरिका’ हे नवीन नाव दिसेल. दरम्यान, कॅनडातील लोकांना ‘लेक ओंटारियो’ हे नाव दिसत राहील. उर्वरित जगात, लेक ओंटारियोला प्राधान्य दिले जाईल, पण कंसात लेक अमेरिका हे नाव देखील दिसेल. ॲपलनेही अमेरिकन वापरकर्त्यांसाठी मॅप्सवर लेक ओंटारियोचे नाव बदलून लेक अमेरिका असे ठेवले.मात्र, आता गुगलने अमेरिकी सरकारची गुगल अटलांटिक महासागरा’चे नाव बदलण्याची विनंती फेटाळली आहे.
Comments are closed.