गूगल मॅप्समध्ये आले नवे फीचर्स, प्रवास आता होणार आणखी सोपा!
गूगल मॅप्स आता आणखी स्मार्ट आणि वापरण्यास सोपे होणार आहे. कंपनीने भारतासाठी खास काही नवीन फीचर्स जोडले आहेत.

रोज लाखो लोक नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स वापरतात. मोठ्या शहरांमध्ये वाट शोधण्यासाठी मॅप्स खूप उपयुक्त असते.

आता गूगलने मॅप्समध्ये जेमिनी AI जोडले आहे. या फीचरमुळे वापरकर्ता थेट बोलून प्रश्न विचारू शकतो.

उदाहरणार्थ ‘जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे?’ असं विचारलं की लगेच उत्तर मिळेल. यासाठी टाइप किंवा स्क्रीनवर टॅप करण्याची गरज नाही.

जेमिनी आता तुमचा कॅलेंडर आणि जीमेल अॅपही वापरू शकते. त्यामुळे तुम्ही प्रवासासोबत तुमचं वेळापत्रकही प्लॅन करू शकता.

नवीन फीचरमुळे ट्रॅफिक जामची माहिती आधीच मिळेल. जर रस्ता बंद असेल किंवा काही अडथळा असेल, तर मॅप्स आधी सांगेल.

हे फीचर सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे सुरू होईल. अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही मिळेल.

ड्रायव्हरला आवाज आणि दृश्य अलर्टद्वारे सावध केलं जाईल. हे फीचर गुरुग्राम, सायबराबाद, चंदीगड आणि फरीदाबादमध्ये आधी सुरू होईल.

मॅप्स आता अधिकृत स्पीड लिमिटही दाखवेल. गूगलने NHAI सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून रस्त्याची स्थिती कळेल.

हायवेवर रेस्टॉरंट, पब्लिक टॉयलेट आणि पेट्रोल पंपाची माहिती मिळेल. भारतासाठी खास तयार केलेल्या या फीचर्समुळे प्रवास आणखी सोपा आणि सुरक्षित होईल.
येथे प्रकाशित : 07 नोव्हेंबर 2025 02:17 PM (IST)
टेक-गॅजेट फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.