घणसोली रेल्वे स्थानकाला गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा विळखा; शिवसेना आंदोलन छेडणार

ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानक गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडल्याने रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील फेरीवाले आणि गर्दुल्ले तातडीने हटवण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोल न छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे.

घणसोली रेल्वे स्थानकात गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांचा वावर वाढल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गर्दीच्या वेळी स्थानकातून बाहेर पडताना किंवा स्थानकात येताना प्रवाशांची मोठी दमछाक होते. गर्दुल्ले टोळक्याने या स्थानकात बसलेले असल्याने प्रवासी घाबरतच स्थानकात प्रवेश करतात. महिला प्रवाशांना तर या गर्दुल्ल्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उपशहरप्रमुख मंगेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घणसोली रेल्वे स्थानकावर धडक दिली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस, उपविभागप्रमुख अरुण ढवळे, दयाशंकर तिवारी, शहर युवाधिकारी सचिन असबे, शहर संघटक मंजू म्हात्रे, उपविभाग संघटक पद्मश्री गायकवाड, संदीप असबे, गीतांजली बुबडे आदी उपस्थित होते.

Comments are closed.