Gopal Badne : मोठी बातमी, निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर


सातारा :  फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने (Gopal Badne Surrender)  फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. मात्र, स्वत: गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने यानं चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. यामुळं मोठी खळबळ उडाली होती….

(ही ब्रेकिंग न्यूज अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा)

आणखी वाचा

Comments are closed.