फाळणीच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते, पाकिस्तानचे हिंदू भारतात आणा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा
गोपीचंद पडलकर: अहिल्यानगर येथे काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आक्षेपार्ह पत्रक भिरकवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज रविवारी (दि. 12) अहिल्यानगर येथे शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) सहभागी झाले होते. या मोर्चात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी फाळणीच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते, पाकिस्तानचे हिंदू भारतात आणा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा, असे वक्तव्य केले आहे. तर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) झालेल्या सभेवर त्यांनी जोरदार हल्लबोल केलाय.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही. देशाची फाळणी झाली तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तिकडचे हिंदू इकडे आणा आणि इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा. त्यावेळी तसं केलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले.
Gopichand Padalkar: अहिल्यानगर न म्हणणाऱ्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करा
अहिल्यानगर येथे झालेल्या एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत अहिल्यानगरचा उल्लेख अहमदनगर करण्यात आला. यावरून गोपीचंद पडळकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये येऊन अहिल्यानगर न म्हणता अहमदनगर म्हणतात. त्यांच्या नाही खुXXX ठोकला तर पाहा. जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर न म्हणणाऱ्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करायला हवे, असे त्यांनी म्हटले.
Gopichand Padalkar: औरंगजेब काय तुमचा आजोबा आहे का?
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, हे कायद्याचे राज्य आहे , इथे तुम्हाला कायदा पाळावाच लागेल. ते म्हणतात आम्हाला औरंगाबाद नाव हवं आहे, औरंगजेब काय तुमचा आजोबा आहे का? या पुढे महामानवाचा अवमान केला तर हिंदू बांधव तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे-जे करत आहेत ते ठरवून करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात लावत असेल तर त्याचे हात तोडून टाकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
Gopichand Padalkar: आम्ही सर्वजण संग्राम जगताप यांच्या पाठीमागे
अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त लव्ह जिहाद, लँड जिहाद होत आहेत. अहिल्यानगरचा कोठला आणि मुकुंदनगर परिसरात ज्या झोपडपट्टी आहे ती केंद्र सरकारची जागा आहे. ती काय तुमच्या बापाची जागा आहे का? तुम्हाला तेथून हाकलून देण्याचे काम संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल. येत्या काळात या देशात धर्मांतर विरोधात एक कडक कायदा येणार आहे. अहिल्यानगर, धाराशिव आणि संभाजीनगर शहराचे नाव कधीही बदलणार नाही. या शहराचे नाव ज्यांना ज्यांना नको आहे ते देश विरोधी आहे हे लक्षात ठेवा. संग्राम जगताप यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणे सोपे नाही, असे देखील गोपीचंद पडळकर म्हणाले.
राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.