‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची सर्वोत्कृष्ट नाटक; ‘माझा पुरस्कार’मध्ये उमटवला ठसा, मंगळवारी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील सोहळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कार सोहळा’ येत्या 24 मार्च रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिर येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. सोहळय़ाचे यंदाचे 20 वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी ‘गोष्ट तिच्या घटस्पह्टाची’ हे ‘माझा पुरस्कार’ विजेते सर्वोत्कृष्ट नाटक  ठरले असून याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून संग्राम समेळ याला सन्मानित केले जाणार आहे. याच नाटकासाठी राजन ताम्हाणे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून संदेश बेंद्रे यांना सन्मानित केले जाणार आहे.

शिवानी रांगोळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘शंकर जयकिशन’ या नाटकासाठी ‘माझा पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. ‘बोलविता धनी’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऋषिकेश जोशी, तर सर्वोत्कृष्ट लक्षवेधी  अभिनेता म्हणून याच  नाटकासाठी क्षितिश दाते याला आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी याच नाटकासाठी मयूरा रानडे हिला सन्मानित केले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयसंपन्न दांपत्य म्हणून ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकासाठी अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांना सन्मानित केले जाणार आहे .

यावेळी हिंदी आणि मराठी प्रेमगीतांची सुरेल मैफल सादर होईल.  जयंत पिंगुळकर, केतकी भावे-जोशी, श्रीरंग भावे, शिल्पा मालंडकर आणि नीलिमा गोखले हे मान्यवर गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून शिल्लक विनामूल्य प्रवेशिका रविवार, 22 मार्चपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिर. दादार येथे सकाळी 8.30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत मिळतील.

Comments are closed.