शासनाची तब्बल 100 कोटींची फसवणूक, कर चुकवण्यासाठी उघडल्या 30 बनावट कंपन्या, गुन्हा दाखल

मुंबई क्राईम न्यूज : शासनाची तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाचा कर चुकवण्यासाठी 30 पेक्षा जास्त बनावट कंपन्या उघडून त्यामार्फत हिरे व्यापार, रस्ते यांची बिल लावण्यात आली आहे. या प्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये ईडीकडून मिळालेल्या माहितीनंतर EOW ने प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.

या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय

या प्रकरणात मदनलाल जैन, गीत एक्सिम प्रा. लि., विभा इम्पेक्स प्रा. लि., पहल इम्पेक्स प्रा. लि. यांसह 30 हून अधिक बनावट कंपन्या तसेच आयएनजी व्हायस्या बँक (सध्या कोटक महिंद्रा बँक) येथील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. तपासानुसार, 2010 ते 2015 दरम्यान आरोपींनी मंगीलाल मोतीराम दवे आणि नरेश मंगीलाल दवे यांच्या नावाने बनावट कंपन्या स्थापन केल्या. हिरे व्यापार आणि रस्ते बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली खोटे बिल व बनावट व्यवहार दाखवून निधी परदेशात वळवण्यात आला. प्राथमिक चौकशीत संबंधितांनी आपली ओळख गैरवापर झाल्याचे सांगितले. त्यांनी मदनलाल जैन यांच्या सूचनेनुसार कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या असून महिन्याला 10,000 रुपयांचे मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

या व्यवहारांमुळे शासनाला सुमारे 100 कोटी किंवा त्याहून अधिक तोटा झाल्याचे समोर

या बनावट कंपन्यांनी मुख्यतः आयएनजी व्हायस्या (आताची कोटक महिंद्रा) बँकेत ह्यूजेस रोड शाखेत खाती उघडली होती. केवायसी नियमांकडे दुर्लक्ष करून ही खाती उघडण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या खात्यांद्वारे सर्क्युलर ट्रान्झॅक्शन, निधीचे लेयरिंग, रोख रक्कम काढणे, कर्जाचा गैरवापर आणि परदेशी रकमेची पाठवणी करण्यात आली. या व्यवहारांमुळे शासनाला सुमारे 100 कोटी किंवा त्याहून अधिक तोटा झाल्याचे तपासात समोर आले आहे.

करचोरी म्हणजे काय?

कर चुकवणे म्हणजे जाणूनबुजून कर भरणे टाळणे किंवा कमी दाखवणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा व्यवसाय संस्था जाणूनबुजून त्यांच्या सर्व उत्पन्नाचा अहवाल देण्यात अयशस्वी होते किंवा त्यांच्या उत्पन्नाचे चुकीचे वर्णन करते, जेणेकरून ते त्यांच्या देय रकमेपेक्षा कमी कर भरतील. कर चुकवणे अनेक प्रकार घेऊ शकते, जसे की कर विवरणपत्रे दाखल करण्यात अयशस्वी होणे, उत्पन्न कमी दाखवणे, कपाती वाढवणे, मालमत्ता लपवणे किंवा इतर फसव्या गोष्टी करणे.

महत्वाच्या बातम्या:

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई, लाच घेताना अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्कला अटक, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.