इथेनॉल निर्मितीत शेतकरी बनणार किंग, मकेचं उत्पादन वाढवण्यावर भर, सरकारनं सुरु केला नवा प्रकल्प
इथेनॉल उत्पादन: देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपायोजना करताना दिसत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात देशाचा पैसा हा इंधनाच्या आयातीवर खर्च होत आहे. त्यामुळं सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं उत्पादन देशात अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियमची आयात कमी करुन ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. इथेनॉलमुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा प्रदाता म्हणूनही ओळखले जाऊ लागला आहेत. यासाठी सरकार मकेपासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच ‘इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.
पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल, यावर्षात ते 20 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट
आतापर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. तर 2025 पर्यंत ते 20 टक्क्यांवर नेले पाहिजे. त्यामुळं केवळ उसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर सरकार भर देत आहे. ऊस आणि भात पिकामध्ये जास्त पाणी वापरले जाते, तर मक्याच्या लागवडीत कमी पाणी वापरले जाते. त्यामुळेच सरकार मकेपासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच ‘इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे’ नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ज्याची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप
या प्रकल्पाची देखरेख करणारे IIMR चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.एल. जाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलसाठी मक्याचे उत्पादन वाढवण्याच्या या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जात आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात 1508 एकरांवर मका पेरणी करून शेतकऱ्यांना त्याची लागवड वाढवण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे, जरी वार्षिक उद्दिष्ट केवळ 1500 एकर होते.
खरीप हंगामात 788 एकर क्षेत्रात मक्याची लागवड
सध्याच्या काळात मका लागवडीचे फायदे शेतकऱ्यांना सांगणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सध्याच्या परिस्थितीत मका लागवडीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच चांगला नफा मिळेल. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात 788 एकर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली. ज्यामध्ये डेमोची संख्या 808 होती. या अंतर्गत 20 प्रशिक्षणे घेण्यात आली, ज्यामध्ये विविध भागातील 425 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या अंतर्गत 67 जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 1508 शेतकरी सहभागी झाले होते.
रब्बी हंगामात 672 एकरांवर मका पेरणी
या प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामात 720 एकरांवर मका पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, तर 672 एकरांवर पेरणी झाली होती. याअंतर्गत 35 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये 897 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या अंतर्गत 43 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले, ज्यात 1500 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात मिळून 1508 एकर क्षेत्रामध्ये मका घेण्यात आला. इथेनॉल बनवण्यात मक्याचे योगदान वाढत असल्याचे जाट यांनी सांगितले. याच्या लागवडीमुळे निसर्गाची हानी होत नाही, त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकार भर देत आहे.
इथेनॉलमध्ये मकेचे योगदान किती?
सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इथेनॉल तयार करण्यासाठी सुमारे 60 लाख टन मकेचा वापर करण्यात आला होता. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2024-25 साठी सुमारे 837 कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले आहे. ज्यामध्ये मक्याचा सर्वाधिक वाटा 51.52 टक्के (सुमारे 431.1कोटी लिटर) आहे. केंद्र सरकार कॉर्नपासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अंतर्गत मका लागवडीला चालना दिली जात आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.