सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त

महाराष्ट्राला परतीच्या पावसाने मोठा फटका दिला. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीने शेतजमिनीच पाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. अकोला येथील शेतकऱ्यांनी 5,8, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले, शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची अहवेलना करण्यात आली आहे.
अकोला येथील शेतकऱ्यांना ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात.
एकीकडे हातातील पीक केलं, जे आहे… pic.twitter.com/mvx0BD7QiR
— विजय वडेट्टीवार (@VijayWadettiwar) 30 ऑक्टोबर 2025
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले, शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची अहवेलना करण्यात आली आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात. एकीकडे हातातील पीक केलं, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही जे नुकसान झालं त्याचा विमा असा पाच रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्यांना मदत सोडा पण त्यांचा असा अपमान करू नका, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.