केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, काय आहे


साधा चांदीचे दागिने आयात बंदी: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या (Silver jewellery) किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  एकीकडे सोन्याचा भाव लाखांच्या पार उसळला आहे तर दुसरीकडे, चांदीची किंमत दीड लाखांच्या जवळपास पोहोचल्या आहेत. अशातच, सणासुदीमध्ये सर्वसामान्यांसाठी सोनं-चांदी खरेदी खिश्याच्या परवडण्याच्या पार गेली आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत (Silver jewellery) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या वर्षाच्या सुरुवातीला लखपती बनलेल्या चांदीची किंमत देशांतर्गत बाजारात आता दीड लाखाच्या दिशेने वेगाने अग्रेसर आहे. सोन्याच्या पाठोपाठ लोकांची चांदीमध्येही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत असून आता केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.(Plain Silver jewellery Import Ban)

Plain Silver jewellery Import Ban: लघु आणि मध्यम व्यवसायांचे हितासाठी

सरकारने एका काल (बुधवारी) अधिसूचनेनुसार, साध्या चांदीच्या दागिन्यांवर पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत आयात निर्बंध लादले आहेत. मुक्त व्यापार करारांचा (FTA) गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात चांदीच्या आयातीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. “आयात धोरणात 31 मार्च 2026 पर्यंत तात्काळ प्रभावाने मुक्त ते प्रतिबंधित असे सुधारणा करण्यात आली आहे,” असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत म्हटले आहे. निर्बंध श्रेणीतील वस्तूंना सरकारकडून परवाना आवश्यक आहे. एप्रिल-जून 2024-25 ते एप्रिल-जून 2025-26 या कालावधीत प्राधान्य शुल्क सवलतींमधून साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. FTA च्या तरतुदींना डावलून होणाऱ्या आयातीमुळे देशांतर्गत उत्पादकांवर प्रतिकूल परिणाम होत होता आणि दागिने क्षेत्रात रोजगाराला आव्हान निर्माण होत होते, अशी माहिती आहे. सरकारचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे भारतातील दागिने उत्पादकांना समान संधी मिळेल, लघु आणि मध्यम व्यवसायांचे हित जपले जाईल आणि या क्षेत्रातील कामगारांसाठी उपजीविकेच्या संधी सुरक्षित होतील. DGFT किंवा परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी केली यामध्ये म्हटले आहे की, या श्रेणीतील आयात आतापर्यंत ‘मुक्त’ होती, पण आता ‘प्रतिबंधित’ करण्यात आली आहे. म्हणजे अशा वस्तू भारतात आणण्यासाठी आता सरकारी परवाना अनिवार्य असणार आहे.

Plain Silver jewellery Import Ban: चांदीच्या आयातीवर सरकारचा मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत मोठी वाढ झाल्याचे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. तपासात असे स्पष्ट झाले की, अनेक देश मुक्त व्यापार करारांचा (FTA) फायदा घेत, ‘साध्या’ या श्रेणीखाली भारतात तयार किंवा डिझाइन केलेले दागिने आयात करत होते. या पद्धतीमुळे करचुकवेगिरी होत असून देशातील स्थानिक उद्योगांना तोटा सहन करावा लागत होता. भारतातील लाखो छोटे कारागीर आणि छोटे व्यवसाय चांदीच्या दागिन्यांवर अवलंबून आहेत. परदेशी दागिने करमुक्त येऊ लागले तेव्हा त्याचा थेट परिणाम स्थानिक उत्पादकांच्या विक्रीवर होऊ लागला, यामुळे छोट्या- छोट्या रोजगाराला धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत, या बंदीमुळे समानतेचे क्षेत्र निर्माण होईल आणि लहान कारागिरांच्या व्यवसायांचे संरक्षण होईल, असा सरकारचा विश्वास आहे. ही बंदी केवळ साध्या चांदीच्या दागिन्यांना लागू आहे. इतर चांदीच्या वस्तू जसे की भांडी, नाणी किंवा औद्योगिक वापरासाठी चांदी यांच्यावर नाही. त्या श्रेणींमध्ये FTA चा गैरवापर होत नव्हता.

आणखी वाचा

Comments are closed.