Government is taking back the money of Ladaki Bahin Yojana will they also return their votes ncp sp mp amol kolhe asked
ज्या योजनेच्या बळावर महायुती सत्तेत आली, त्या योजनेचे निकष आता सरकार बदलू पाहात आहे. आणि यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. या निकषांवरून राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर योजना ठरली होती. याच योजनेच्या बळावर महायुती विक्रमी बहुमताने राज्यात पुन्हा विजयी झाली. मात्र, ज्या योजनेच्या बळावर महायुती सत्तेत आली, त्या योजनेचे निकष आता सरकार बदलू पाहात आहे. आणि यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. या निकषांवरून राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. (government is taking back the money of Ladaki Bahin Yojana will they also return their votes ncp sp mp amol kolhe asked)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत. येत्या 26 जानेवारीला महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार आहे. मात्र, या सगळ्यापूर्वी सरकारने महिलांना अर्जाची छाननी करण्यास सांगितले होते. यामुळे अनेक महिलांनी स्वतःच लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेतले आहेत. अनेकांनी तर सरकारने दिलेले पैसे देखील परत केले आहेत. जवळपास 4 हजार महिलांनी हे पैसे परत केल्याचे समजते. दरम्यान, सरकारच्या या धोरणामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्याची माहिती आहे. यावरूनच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील, पैसे परत घेताय तर मतेही परत देणार का, असा प्रश्न सरकारला विचारला आहे. तशी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घ्यायचाय? जाणून घ्या कसा कराल अर्ज
निवडणुकीपूर्वी घाईघाईने योजना आणून लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सरकार परत घेणार आहे म्हणे. मग या अपात्र ठरवलेल्या बहिणींनी दिलेली मतं सत्ताधारी परत करणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार?
मग त्या “आमिषापोटी” त्या बहिणींनी दिलेली मते सुद्धा परत देणार का?#Question #Answer #Maharashtra— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 18, 2025
राज्यभरातून अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्याला पैसे नको असल्याचे सांगितले आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज माघार घ्यायला सुरुवात केली आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी त्यांनी मिळवलेली रक्कम थेट हस्तांतर योजनेशी सलंग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.
या योजनेसाठी राज्यातील 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केला होता. त्यातील 2 कोटी 47 लाख महिला या यासाठी पात्र आहेत. यातील 2 कोटी 34 लाख महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे 1500 रुपये दर महिना देण्यात आले. पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील, असा अंदाज आहे.
हेही वाचा – Ballot Paper Voting : पुन्हा मारकडवाडी पेटणार? उत्तमराव जानकर आमदारकीचा राजीनामा देणार
Comments are closed.