वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.
विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे भास्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आदींनी सहभागी घेतला. वडेट्टीवार म्हणाले, विदर्भातील हजारो कुटुंबे जंगलावर आधारित रोजगारावर अवलंबून आहेत. तेंदूपत्ता, मोहफूल आणि इतर वन उत्पादनांच्या संकलनासाठी त्यांना जंगलात जावेच लागते. अशा परिस्थितीत केवळ आर्थिक मदत देऊन प्रश्न सुटणार नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या लक्षवेधीला उत्तर देताना वनमंत्री नाईक म्हणाले की, राज्य शासन वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवत आहे. पुढील ४२ महिन्यांत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशातील प्रत्येक जिल्ह्यात पाच हजार एकर जागेवर बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली.
अशा लोकांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा- मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ३० दिवसांत नुकसानभरपाई द्यावी असा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. वित्त विभागाने पैसे उपलब्ध केले नाहीत असे उत्तर मिळते. मागच्या वर्षी ४० मृत्यू झाले. मृत्यूनंतर सहा-सहा महिने मदतच मिळत नसेल तर लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्यांची मदत अडवणाऱ्या लोकांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा.
गावागावात स्वच्छता अभियान राबवा आदित्य ठाकरे शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी वाघ आणि बिबट्यांना मानवी वस्त्यांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी गावागावात स्वच्छता अभियान राबवा, अशी सूचना शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडली. ते म्हणाले की, राज्यात आणि देशात वाघांची, बिबट्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रात अद्याप नरभक्षक झालेले नाहीत जसे सुंदरबनमध्ये झालेत. रिस्पॉन्स टीमला मानधन मिळत नाही. कच्याच्या ठिकाणी कुत्रे येतात त्यामुळे तिथे वाघ येतात आणि मग तिथे लहान मुले सापडली तर त्यांच्यावर हल्ले होतात. त्यामुळे गावागावांत स्वच्छतेची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर ग्रामविकास विभागाच्या सहकायनि स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

Comments are closed.