गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांच्या आरोपात तथ्य; वैरागमध्ये साडेसात लाख रुपयांचा प्लॉट केलेला ख
वैराग : लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर लुखामसलाचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पूजाविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी १० सप्टेंबर रोजी तिला बार्शी न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
यावेळी वैराग पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागणी केली होती, मात्र न्यायालयाने फक्त दोन दिवसांचीच कोठडी मंजूर केली. या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात अधिक मुदत मागण्यामागे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. घटनास्थळी वापरलेली पिस्तूल नेमकी कुठून आली? त्याचा परवाना होता का? त्यात किती बुलेट होत्या आणि उर्वरित कुठे आहेत? मयत गोविंद बर्गेकडे ही पिस्तूल कशा मार्गे आली? यासारख्या मुद्द्यांवर तपास व्हावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे. तसेच गोविंद आणि पूजामध्ये झालेले आर्थिक व्यवहार, त्यांचे मोबाईलवरील संवाद आणि त्यांची नोंद याबाबत माहिती मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.
साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे
पूजा गायकवाड हिला गोविंद बरगे यांनी वैराग येथे सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा एक प्लॉट खरेदी करून दिला होता, हे उघड झाले आहे. ज्यावेळी सदर प्लॉटची खरेदी करण्यात आली. त्याची रजिस्टर खरेदीच्या कागद पत्रात गोविंद बरगे यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे. यावरून पूजा हिला गोविंद बरगे यांनी प्लॉट, जागा, सोनेनाणे खरेदी करून दिले होते. या नातेवाइकांच्या आरोपात तथ्य आढळून आले. आणखी काय काय व्यवहार पूजा गायकवाड व गोविंद बरगे यांच्यात झाले, हे पोलिस तपासात उघड होणार आहे.
कोण आहे पूजा गायकवाड?
पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रिल्स शेअर करायची. गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरण सुरु असताना पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते. गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी केली होती.
नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आणखी वाचा
Comments are closed.