गोविंदाच्या आयुष्यात सुनीताच ‘बिग बॉस’

गेले काही दिवस अभिनेते गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाची चर्चा जागोजागी रंगू लागली आहे. घरातील जवळची नातेवाईक मंडळी मात्र गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्पह्टाच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे बोलत आहेत तर दुसरीकडे सुनीता आहुजा यांना बहुचर्चित रिऑलिटी शोमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही घटस्पह्टाची चर्चा पब्लिसिटी स्टंटचा भाग असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे तूर्तास तरी गोविंदा यांच्या आयुष्यात सुनीताच बॉस असल्याचे स्पष्ट होत आहे.

गोविंदा यांचे विवाहबाह्य संबंध, सासरच्यांसोबत असलेला बेबनाव, गोविंदा यांच्यावरील त्यांचे प्रेम अशा अनेक मुद्दय़ांवर बोलून सुनीता प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत. वयाच्या या टप्प्यावर घेण्यात येणारा घटस्पह्ट हा ग्रे डिवोर्स म्हणून ओळखला जातो. त्यावरही आता सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. सुनीता आहुजा या कायमच त्यांच्या परखड आणि स्पष्टवत्तेपणासाठी ओळखल्या जातात. गोविंदासोबतच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातही सुनीता यांनी गोविंदा यांच्याबाबत कुठलाही आडपडदा न ठेवता वेळोवेळी स्पह्टक वक्तव्ये केली आहेत.

तो अपघात

पाच महिन्यांपूर्वी रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवताना चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाले होते. गोळी पायात घुसल्याने गोविंदा थोडक्यात बचावले. मात्र पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे हा प्रकार चुकून घडला की कसा, अशी चर्चा रंगली होती.

Comments are closed.