भव्य ग्राहक पेठेचे आयोजन

महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मीनल मोहाडिकर आयोजित भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन शुक्रवारी ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते करण्यात आले. ही ग्राहक पेठ 28 सप्टेंबर 2025 पर्यंत वनीता समाज हॉल, दादर (पश्चिम) या ठिकाणी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. या ग्राहक पेठेत साडय़ा, ज्वेलरी, बॅग्ज, गाऊन्स, पंजाबी ड्रेस, पापड, ड्रायफ्रूट्स, रांगोळी, पैठणी साडय़ा, सौंदर्य प्रसाधने मिळतील. या ठिकाणी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
Comments are closed.