ग्रँड हयातमध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुढीपाडव्यानिमित्त सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय कामगार सेना आणि हॉटेल व्यवस्थापनाच्यावतीने आयोजित या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलचे मुख्यालय शिकागो येथे आहे. त्यामुळे मुंबईत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यानिमित्त ‘जय महाराष्ट्र’चा नारा शिकागोत घुमला.

गेल्या दहा वर्षांपासून ग्रॅंड हयात
हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्यावतीने गुढीपाडवा सोहळा आयोजित केला जातो. इतक्या मोठय़ा हॉटेलमध्ये गुढीपाडवा सोहळा आयोजित करणारे हे पहिलेच हॉटेल ठरले आहे, अशी माहिती आयोजक – भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी दिली. या वेळी शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते – खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, आमदार अॅड. अनिल परब, आमदार – सहचिटणीस सचिन अहिर, अजित साळवी, नगरसेवक शर्वरी परब, सदा परब, पूजा महाडेश्वर, गीतेश राऊत, वाकोला येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, एसीपी ज्योत्सना रासम, शाखाप्रमुख गजा सावंत, जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, युवासेनेचे रुची राऊत, वैभव गुरव तसेच व्यवस्थापनाकडून हॉटेल मॅनेजर सुमित दत्ता, एचआर विभागाकडून निना दासन उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युनीट सेव्रेटरी प्रशांत नाईक, अभय प्रभू, उपाध्यक्ष सिद्धेश पांढरकामे, खजिनदार कुश गवस, संजय पाते, संदेश परब, प्राजक्त तेली, हीना शेख आदींनी मेहनत घेतली.

Comments are closed.