शुक्रवारपासून ग्रंथालीचे साहित्य संमेलन

‘ग्रंथाली’चे मुंबई जिल्हा साहित्य संमेलन 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा पश्चिम येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष नाटककार अभिराम भडकमकर आहेत.
संमेलनाचे उद्घाटन 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी राजीव श्रीखंडे लिखित ‘ग्लोबल साहित्यसफर भाग 1’ या ग्रंथाचे प्रकाशन रामदास भटकळ यांच्या हस्ते होईल. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत ‘कवितेचे वारसदार’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये डॉ. सिसिलिया कार्व्हालो, किरण येले, महेंद्र कोंडे, वृषाली विनायक आणि संकेत म्हात्रे सहभागी होतील. दुपारी 2 वाजता ‘संहितालेखन आणि एआय’ यावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5.30 वाजता ‘जन्मशताब्दी अभिवादन’ कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 8 वाजता संमेलनाची सांगता होईल.

Comments are closed.