फिलिपिन्समध्येही आता ग्रोक वेबसाईटवर बंदी
एलोन मस्क यांचे एआय चॅट बॉक्स ग्रोक सध्या वादाच्या भोवऱयात सापडले आहे. इंडोनेशिया, मलेशिया या देशांनंतर आता फिलिपिन्स सरकारने ग्रोक वेबसाईटवर बंदी घातली आहे. ग्रोकचा एआय अश्लील आणि आक्षेपार्ह पह्टो बनवण्याची परवानगी देत असल्याने सरकारने यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता फिलिपिन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्ससोबत चर्चा करण्याची तयारी करत आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, फिलिपिन्स सरकारच्या म्हणण्यानुसार, ग्रोकमध्ये पोर्नोग्राफिक पंटेट बनवण्याची क्षमता एक मोठा धोका बनला आहे. सायबर गुन्हे तपास आणि कोऑर्डिनेटिंग सेंटरचे प्रमुख रेनाटो पराइसो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोकमधून अश्लील आणि खास करून चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी फीचर्स हटवण्यात यावेत. ग्रोकच्या याच कारणामुळे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्सला ग्रोक वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचलले आहे. फिलिपिन्स सरकारने ग्रोकची वेबसाईट ब्लॉक केली आहे.
Comments are closed.