Groundnuts were taken to the market and washed away due to rain union agriculture minister directly calls a farmer in marathi
मी कृषिमंत्री आहे. मला शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी तुमचा व्हिडीओ बघून तुम्हाला धीर देण्यासाठी कॉल केला आहे. काळजी करू नका. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे.
Agriculture Minister : नवी दिल्ली : भर पावसात वाहून जाणारा शेतमाल वाचवण्याचा प्रयत्न एक शेतकरी करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. महाराष्ट्रातील या शेतकऱ्याच्या व्हिडीओची दखल थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली. व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण हळहळला. शेतातून बाजारात विक्रीसाठी आणलेला भुईमूग अवकाळी पावसाने वाहून जाऊ लागला. आणि भर पावसात शेतकरी तो अडवण्याचा प्रयत्न करत होता. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील या शेतकऱ्याला कॉल करत धीर दिला आणि मदतीची खात्री दिली. गौरव पनवार असे या शेतकऱ्याचे नाव असून तो वाशीम येथील आहे. (groundnuts were taken to the market and washed away due to rain union agriculture minister directly calls a farmer)
शेतकऱ्याशी संवाद साधतानाचा शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. “पाऊस पडल्यामुळे तुमचा भुईमूग खराब झाल्याचा व्हिडीओ मी बघितला. हे बघून मला फार दुःख झाले. पण तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्रातील सरकार संवेदनशील आहे. माझे आताच त्यांच्याशी बोलणे झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील असल्याचे शिवराज सिंह चौहान पनवार यांना म्हणाले.
हेही वाचा – Sofiya Qureshi : बोलताना विचार केला नाहीत, आता परिणामही भोगा… सर्वोच्च न्यायालयाने शहा यांना फटकारले
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे. बाजारात जे नुकसान झाले त्याची भरपाई तुम्हाला दिली जाईल. जेणेकरून तुमची अडचणी होऊ नये. सोमवारपर्यंत पाहणी करून जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केली जाईल, असेही चौहान यांनी शेतकऱ्याला सांगितले.
सोशल मीडिया पर महाराष्ट्र के किसान भाई श्री गौरव पंवार जी का मार्मिक वीडियो देखकर हृदय विचलित हो गया।
असमय बारिश ने मंडी में रखी उनकी मूंगफली की फसल को बर्बाद कर दिया। किसान होने के नाते मैं इस पीड़ा को भली प्रकार समझ सकता हूं। मैंने गौरव जी से फोन पर बात की, उन्हें ढांढस… pic.twitter.com/gGn6a3BuMi
— Office of Shivraj (@OfficeofSSC) May 18, 2025
मी कृषिमंत्री आहे. मला शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी तुमचा व्हिडीओ बघून तुम्हाला धीर देण्यासाठी कॉल केला आहे. काळजी करू नका. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे, असेही शिवराज सिंह चौहान गौरव पनवार यांना म्हणाले.
महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. काही दिवसांपूर्वी गौरव पनवार यांनी शेतात निघालेला भुईमूग विक्रीसाठी बाजारात आणला होता. पण, अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे काही वेळातच पाणी वाहू लागले आणि त्यात भुईमूगही वाहून जाऊ लागला. वाहून जाणारा भुईमूग थांबवतानाचा पनवार यांचा भर पावसातील व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Comments are closed.