गगन्यानशी संबंधित ग्रुप कॅप्टन कृष्णन आठवले

वायुदलाचे महत्त्वाचे पाऊल :

भारतीय वायुदलाने देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी निवड झालेल्या चार भारतीय वायुदल अधिकाऱ्यांपैकी एक ग्रूप कॅप्टन अजीत कृष्णन यांना तत्काळ परत बोलाविले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. कृष्णन हे दिल्लीत ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी गेले होते, परंतु त्यांना आता परत येण्याचा कॉल आला आहे.

भारतीय वायुदलाने मला परत बोलाविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारतीय आणि रशियन अंतराळ संस्थांच्या समर्थनामुळे अंतराळवीरांचे प्रशिक्षण उत्तमप्रकारे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. इस्रो बेंगळूर येथे एक समर्पित अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र स्थापन करत आहे. 2003 मध्ये वायुदलात सामील झालेले ग्रूप कॅप्टन कृष्णन हे एक अनुभवी वैमानिक आणि फ्लाइट इंन्स्ट्रक्टर आहेत. त्यांच्याकडे एसयू-30एमकेआय आणि मिग-29 यासारख्या विमानांवर जवळपास 2,900 तास उड्डाणांचा अनुभव आहे.

2027 मध्ये गगनयान मोहीम साकारणार

गगनयान मोहीम आता 2027 च्या प्रारंभी साकारली जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेच्या अंतर्गत तीन अंतराळवीर पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठविले जाणार आहेत. त्यानंतर ते सुखरुप पृथ्वीवर परतणार आहेत.  सध्या कृष्णन आणि त्यांचे सहकारी अंगद प्रताप हे भारतात प्रशिक्षण घेत आहेत. तर अन्य दोन सदस्य शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर हे आगामी एक्सिओम-4 मोहिमेसाठी अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहेत.

Comments are closed.