Home Gardening: घरच्या घरी करा या भाज्यांची लागवड
आजकाल बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आपण पाहतो. शिवाय बाजारातील भाज्या फ्रेश राहण्यासाठी हानिकारक रसायने वापरली जातात त्यामुळे आरोग्यासाठी ते चांगले नसते. त्यामुळेच घरगुती भाज्या आरोग्यासाठी चांगल्या ठरतात. त्यामुळे तुमच्या घरात देखील तुम्ही काही भाज्यांची लागवड करू शकता. वेळोवेळी पुरेसे पाणी व पुरेसा सूर्यप्रकाश त्याच्या वाढीस मदत करतो. त्या भाज्या नेमक्या कोणत्या ते पाहुयात..
हिरवी मिरची:
हिरव्या मिरची लागवड करण्यासाठी बियांचा वापर केला जातो. मातीमध्ये मिरचीच्या बिया टाकून योग्य काळजी घेतल्यास आपल्या घरच्या बागेत सहज मिरचीचे रोप वाढवू शकता.
पालक:
पालेभाज्या या घरच्या बागेत उगवणे सोपे असते. शिवाय त्यासाठी जागाही कमी लागते. पालकाचे बियाणे कंपोस्ट मिश्रित जमिनीत अर्धा ते एक इंच खोलीवर लावून पिकवले जाते. या रोपांमधील अंतर ७-११ इंच असावे.
मुळा, गाजर
मुळा ही अतिशय वेगाने वाढणारी भाजी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला याची लागवड करणे फायद्याचे ठरू शकते. मुळा गाजर या भाज्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
कोथिंबीर:
घरच्या घरी कोथिंबीर उगवणे अत्यंत सोपे असते. घरातील एखाद्या कुंडीत धने रगडून टाकावे. त्याला दररोज थोडे थोडे पाणी घालावे.
टोमॅटो:
टोमॅटोची लागवड अगदी सहजपणे घरच्या घरी करता येते. थंडीत टोमॅटोची पेरणी करणे चांगले असते.
भेंडी:
तुमच्या घरच्या बागेत जागा असल्यास तुम्ही भेंडीही घरी उगवू शकता. उन्हाळ्यात भेंडीची वाढ होते. भेंडीच्या पेरणीपूर्वी बियाणे रात्रभर भिजवून नंतर रांगेत पेरले जाते.
Comments are closed.